Advertisement
Online Education: ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणासाठी सर्वसमावेशी दृष्टीकोन असावे असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. करोना महामारीमुळे शिक्षणाची ताकद आणि गुणवत्तेवर परीणाम झाल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर पडू शकतात असेही ते म्हणाले. आंध्रप्रदेशच्या अनंतपुरम येथील केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या स्थापनादिनी सर्वांना व्हर्चुअल मार्गदर्श केले. यावेळी ते बोलत होते. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांच्या शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध करण्यास प्राधान्य देणाऱ्या संस्थांची सध्या गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. दूरवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ब्रीज बनावे. तसेच सामाजिक आणि आर्थिक कमजोर वर्गातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या बाहेर होऊन डिजिटल अंतर निर्माण होऊ नये याबाबतीत सतर्कता बाळगावी लागेल असेही ते म्हणाले. विशेषत: ग्रामीण क्षेत्रांमध्ये इंटरनेट पोहोचणे आणि यंत्रणेत सुधार आणण्यासाठी भारत नेट सारख्या योजना तात्काळ अंमलात आणायला हव्यात असे उपराष्ट्रपती म्हणाले. भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रमाची कमतरतेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसेच औद्योगिक शिक्षण क्षेत्रामध्ये स्थानिक भाषांचा सहभाग अधिक असावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अलीकडेच त्यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे विकसित करण्यात आलेल्या संकल्पनेबद्दल सांगितले. याद्वारे इंग्रजी भाषेचे साहित्य ११ भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन अनुवादित केले जाते. अशा प्रकारचे प्रयत्न इतर ठिकाणी देखील व्हायला हवेत असे ते म्हणाले. ऑनलाइन शिक्षणावर विशिष्ट लोकांचाच अधिकार राहायला नको तर संपूर्ण देशात शिक्षण हे लोकशाही बळकट करण्याचे अंतिम साधन असायला हवे असेही ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WugCHg
via nmkadda