Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २१, २०२१ WIB
Last Updated 2021-08-21T04:43:54Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

राज्यातील सीईटीच्या तारखांची अद्याप प्रतीक्षाच; लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामुळे ही परीक्षा देऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या परीक्षा वेळेत न झाल्यास भविष्यात शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडणार असल्याची भीतीही व्यक्त होत आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी याबरोबरच लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी कक्षाकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सीईटी गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमांच्या राज्यभरातील विविध संस्थातील सुमारे चार लाख जागांवरील प्रवेश हे प्रवेशपूर्व परीक्षांच्या गुणावरच दिले जातात. यंदा या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट कल्पना दिलेली नाही. विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणी पूर्ण केली आहे, मात्र परीक्षा कधी होणार हेच सांगितलेले नाही. १५ विविध सीईटीसाठी राज्यभरातून तसेच, राज्याबाहेरील तब्बल ७ लाख ७४ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याचे शुल्कही भरली आहे. हे विद्यार्थी परीक्षांच्या तारखांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश परीक्षा कक्षामार्फत परीक्षा घेणाऱ्या कंपनी बदलण्याची मोहीम गेल्या वर्षापासून सुरू आहे. यामुळे हा विलंब होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षा वेळेत न झाल्यास राज्यातील उच्च शिक्षणाचे शैक्षणिक सत्रच कोलमडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने आठवडाभरात परीक्षाबाबत परिपत्रक काढून विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. एमएचटी सीईटी- ४२४७७३, एमबीए/एमएमएस- १३२१९०, एमसीए- २५२०८, विधी ५ वर्ष- २४९७१, विधी ३ वर्ष- ६८८७२, बीएबीएड, बीएस्सीबीएड (एकात्मिक)- ३९४७, एमएड- २७८०, बीपीएड- ६८८८, एमपीएड- २०३९, बीएड-एमएड (एकात्मिक)- १५०७, बीएड जनरल स्पेशल- ७५७१७, बीएचएमसीटी- १४६०, एमएचएमसीटी- ५०, एमआर्च- १०९५ आणि फाईन आर्ट- ३३६२ याप्रमाणे सीईटी परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WaRDbQ
via nmkadda