दिल्ली विद्यापीठातर्फे ऑफलाइन वर्ग सुरु करण्याचा निर्णय मागे Rojgar News

दिल्ली विद्यापीठातर्फे ऑफलाइन वर्ग सुरु करण्याचा निर्णय मागे Rojgar News

cancelled the decision: दिल्ली विद्यापीठातर्फे (Delhi University) १६ ऑगस्टपासून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. दिल्ली विद्यापीठातर्फे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. करोनाच्या केसेसमध्ये कमी आल्याच्या पार्श्वभूमीवर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग सुरु करण्याची घोषणा विद्यापीठातर्फे करण्यात आली होती. पण या निर्णयाला शिक्षकांच्या एका गटाने विरोध करत विद्यापीठाच्या निर्णयावर नाराजी दर्शविली. विद्यापीठ आणि अंतर्गत येणाऱ्या कॉलेजमध्ये सायन्स शाखेच्या पीजी आणि यूजी अभ्यासक्रमासाठी १६ ऑगस्टपासून ऑफलाइन शिक्षणास परवागी देण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती रजिस्ट्रार विकास गुप्ता यांनी दिली. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने शाळा-कॉलेज उघडण्यासंदर्भात कोणतेही दिशानिर्देश जाहीर केले नाहीत. अशावेळी विद्यापीठाचा परिसर खुला करणे हे कायद्याचे उल्लंघन झाले असते. म्हणून आम्ही निर्णयाची वाट पाहतोय असे ते म्हणाले. शिक्षकांच्या एका वर्गाने या निर्णयाला विरोध केल्याने निर्णय मागे घेण्यात आला असे झाले नाही. निर्णयावर आलेल्या प्रतिक्रियांवर विद्यापीठाने विचार केला. विज्ञान पीजी आणि यूजी अभ्यासक्रमासाठी ऑफलाइन वर्ग आणि प्रयोगशाळांसंदर्भात निर्णय अचानक नोटिफिकेशन आल्याने अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या होत्या असे प्रोफेसर आभा हबीब म्हणाले. देशामध्ये सध्या १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सध्या सुरु आहे. अशावेळी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना त्यांचे पूर्ण लसीकरण करण्याचा वेळ द्यायला हवा. गर्दीचे वर्ग, प्रयोगशाळांमध्ये शिकण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असता. शिक्षक सामान्य स्थिती परत येण्याची वाट पाहत असल्याचे हबीब म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fFaXF4
via nmkadda

0 Response to "दिल्ली विद्यापीठातर्फे ऑफलाइन वर्ग सुरु करण्याचा निर्णय मागे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel