Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २०, २०२१ WIB
Last Updated 2021-08-20T12:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबईत पाड्यांवरील विद्यार्थी नेटअभावी अडचणीत Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये जागोजागी मोबाइल टॉवर उभे असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणासाठी कुठेतरी आडोशाला, चौकामध्ये, नदीच्या किनारी नेटवर्क शोधावे लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज असल्याचे आदिवासी पाड्यातील स्थानिकांनी म्हटले आहे. शहराच्या वेशीजवळ असलेल्या पाड्यांमध्ये काही वेळा इंटरनेटची रेंज मिळते. मात्र तुमनीपाडा, चुनापाडा, पाताचा पाणी, रजनीपाडा येथील विद्यार्थी रेंजच्या शोधात घराच्या बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला अभ्यासाला बसतात. सध्या पावसामध्ये अभ्यास करताना मान आणि खांद्यामध्ये छत्री धरायची, मांडीवर मोबाइल आणि वही अशी कसरत करत त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला लागते. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना शाळा, महाविद्यालयांमधील त्यांच्या वर्गांमध्ये उपस्थिती लावणे शक्य होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुमारे ७० टक्के लोकांकडे स्मार्ट फोन नसावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोनची सोय नाही त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती ह्युमन राइट्स काऊन्सिल ऑफ इंडियाचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील स्थानिक संजय नाडार यांनी दिली. जंगलामध्ये अनेक मूलभूत गरजांची वानवा आहे. मात्र या संदर्भात कधी तक्रार केली की जंगल सोडून दुसरीकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये राहाण्याचा प्रस्ताव समोर ठेवला जातो, अशी खंत येथील स्थानिक व्यक्त करतात. पाणी, स्वच्छतागृहे यापासून वंचित असताना येथील विद्यार्थी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर जाऊन किमान शिक्षण तरी घेऊ शकत होते. मात्र शाळा बंद असल्याने त्यांचा शिक्षणाचा मार्गही खुंटला आहे. नोकऱ्या गेल्याने शाळांची फी भरणेही शक्य होत नाही, असेही काही स्थानिकांनी सांगितले. उद्यानात प्रामुख्याने पाचवी ते बारावी वर्गातील ७० ते ८० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जानूपाडा येथील मातृभूमी शाळा आणि महाविद्यालय, अभिनव विद्यामंदिर, गोखले महाविद्यालय येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण खुंटले काही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपस्थित राहणे अशक्य झाल्याने घरच्यांना मदत म्हणून चिंचा-बोरे, कैऱ्या, भाज्या विकू लागले आहेत. इतर वेळी हे विद्यार्थी शाळेनंतर ही मदत करायचे, याकडेही नाडार यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षणापर्यंत पोहोचू न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयामध्ये येऊन शिकण्याची सोय व्हावी, जंगलाच्या हद्दीमध्ये त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी एखाद्या हॉलमध्ये त्यांच्या बसण्याची सोय व्हावी असे पर्याय सुचवण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/381DdgC
via nmkadda