Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-08-30T07:43:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती Rojgar News

Advertisement
Nashik : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नाशिक ग्रामीण आरोग्य विभागाच्या अंतर्गत एकूण ६० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना यासंदर्भात सविस्तर माहिती मिळू शकले. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून १ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान अर्ज पाठवू शकतात. आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त जागांमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सरकारी पोर्टलवर मार्च २०१९ मध्ये अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्याची गरज पाहता या पदभरती अंतर्गत फार्मासिस्ट आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पदभरतीअंतर्गत मागासवर्गीय उमेदवार, अपंग उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://maharddzp.com/ वर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. १४ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WD6dZy
via nmkadda