Advertisement
MDS : वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) तर्फे NEET MDS काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी आजपासून सुरु झाली आहे. MCC ची अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार २०ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दुपारी १२ वाजेपर्यंत यासाठी नोंदणी करू शकतील. तर उमेदवारांना रात्री ११.५५ पर्यंत फी भरता येऊ शकेल. पर्याय भरणे आणि लॉकिंग प्रक्रिया २१ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान पूर्ण केली जाणार आहे. या स्टेप फॉलो करुन करा नोंदणी पहिल्या फेरीच्या काऊन्सेलिंगला नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in ला भेट द्यावी. होमपेजवर उपलब्ध NEET MDS काऊन्सेलिंग रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. आता रजिस्ट्रेशन पेज खुले होईल. विचारलेले सर्व तपशील भरा आणि फॉर्म सबमिट करा. तुम्हाला लॉगिन मिळेल. तुम्हाला मिळालेल्या लॉगिन क्रेडेन्शियलचा वापर करून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकाल. पहिल्या फेरीचा सीट वाटप निकाल २७ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारांना २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२१ पर्यंत रिपोर्ट करावा लागेल. त्याचबरोबर समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी ६ सप्टेंबरपासून सुरू होईल. ९ सप्टेंबर ही दुसऱ्या फेरीच्या नोंदणीची अंतिम तारीख आहे. चॉइस फिलिंग आणि आणि लॉकिंग प्रक्रिया ७ ते १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. दुसऱ्या फेरीसाठी जागा वाटपाचा निकाल १३ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारांना १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरपर्यंत अहवाल द्यावा लागेल. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक तपासता येऊ शकते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DdiyVs
via nmkadda