Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत काही अभ्यासक्रमांच्या उन्हाळी - २०२१ परीक्षा सुरू होण्यापूर्वीच नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश मिळालेल्या या विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्राची परीक्षा पास होणे आवश्यक आहे. आरोग्य विद्यापीठामार्फत उन्हाळी २०२१ सत्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू झाल्या. सोबत काही पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षाही सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्षपणे होत असल्यामुळे कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा टप्प्या-टप्प्याने घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. त्यामुळे काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांना विलंब होत असून, या परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांचे होणो नुकसान टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्र आरोग्य विद्यापीठामार्फत एक ऑगस्टपासून सुरू करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२१ परीक्षा द्याव्या लागणार आहेत. या परीक्षा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर मात्र ही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचेच नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेश ग्राह्य धरले जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. .... या अभ्यासक्रमांबाबत निर्णय बीडीएस, बीडीएस (द्वितीय व तृतीय वर्ष, बीएएमएस (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष), बीयूएमएस (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष), बीएचएमएस (द्वितीय व तृतीय वर्ष), नर्सिंग (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष), बीपीटीएच (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष), बीओटीएच (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष), बीएएसलपी व बीपीओ या अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kiGA8I
via nmkadda