Advertisement
RCFL Recruitment 2021: मुंबईतील लिमिटेडमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडच्या प्रशासकीय विभागात एकूण १९ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडच्या भरती अंतर्गत अधिकारी, व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मॅनेजर फायनान्स ई४ ग्रेड च्या देशभरात ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे बीकॉम, बीएमएस, बीएएफ, बीबीए यापैकी पदवी किंवा एमबीए, एमएमएस आणि समकक्ष अशा फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना ७० हजार ते २ लाखापर्यंत पगार दिला जाईल. मुख्य व्यवस्थापक पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी बीकॉम, बीएमएस, बीएएफ आणि बीबीए किंवा फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणे गरजेचे आहे. या पदासाठी ९० हजार ते २ लाख ४० हजार पर्यंत पगार दिला जाणार आहे. ऑफिसर फायनान्स पदाच्या एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी सी आणि सीएमए असणे गरजेचे आहे. या पदासाठी ४० हजार ते १ लाख ४० हजार पर्यंत पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिनांक ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j5hsD7
via nmkadda