Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २३, २०२१ WIB
Last Updated 2021-08-23T07:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दिल्ली विद्यापीठात २० हजार जागांसाठी १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज Rojgar News

Advertisement
DU Admission 2021: दिल्ली विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या वर्षी पीजी कोर्स (DU PG Course Admission 2021) मध्ये प्रत्येक एका जागेसाठी सरासरी ९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विविध मास्टर्स अभ्यासक्रमांमध्ये साधारण २० हजार जागा आहेत पण या जागांसाठी १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासठी विद्यापीठात चढाओढ पाहायला मिळणार आहे. दिल्ली विद्यापीठात शनिवारी संध्याकाळपर्यंत ३ लाख ३८ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. यामुळे दिल्ली विद्यापीठात यावर्षी अर्जाचे सर्व रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. एका अंदाजानुसार, केवळ पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यावर्षी ४ लाखांहून अधिक अर्ज येतील. गेल्या वर्षी अशा अर्जांची संख्या साधारण ३ लाख ५० हजारपर्यंत होती. एमफिल कोर्समध्ये नोंदणी एमफिल आणि पीएचडीसाठी सुमारे २८ हजार ८२७ नोंदणी झाल्या आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा २६ सप्टेंबरपासून होणार आहे. प्रवेश परीक्षा २६, २७, २८, २९ आणि ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. प्रवेश परीक्षा दिल्ली-एनसीआरसह २७ शहरांमधील परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. २६ जुलैपासून नोंदणी दिल्ली विद्यापीठात पीजी, एमफिल आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू झाली. ही ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया शनिवारी रात्री ११.५९ वाजता पूर्ण झाली. कुलगुरु प्राध्यापक पिंकी शर्मा यांच्या मते, पीजी, एमफिल आणि पीएचडीच्या नोंदणीची तारीख वाढवली जाणार नाही. दिल्ली विद्यापीठात पीजीच्या ७५ अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर, पीएचडी आणि एमफिल अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी केली आहे. दिल्ली विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती आपल्या अधिकृत पोर्टलवर शेअर केली आहे. डीयूचे रजिस्टार विकास गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाच्या शताब्दी वर्षांतर्गत फतेहपूर बेरीच्या भट्टी कलाण गावात एक सुविधा केंद्र आणि महाविद्यालय बांधले जाणार आहे. ज्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. गुणवत्तेवर प्रवेश दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनेक पीजी अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. दिल्ली विद्यापीठात पीएचडी, एमफिल आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नोंदणी २६ जुलैपासून सुरू झाली. या अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट होती. पदवी संबंधित अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू झाली आणि ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mlGGzb
via nmkadda