Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट १०, २०२१ WIB
Last Updated 2021-08-10T07:43:25Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आता आयआयटीतून शिका जेईई न देता डिग्री कोर्स! तेही घरबसल्या!! Rojgar News

Advertisement
Application 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीसारख्या मोठ्या संस्थेतून जर तुम्हाला घरबसल्या शिकायचं आहे, तर आता तुमच्यासाठी संधी आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास () प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्समध्ये जगाला पहिला बीएससी डिग्री आणि डिप्लोमा कोर्स सुरू करणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रम शिकण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. बारावी उत्तीर्ण करणारे आणि दहावीमध्ये इंग्रजी आणि गणिताचा अभ्यास केला आहे असे सर्व विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र ठरणार आहेत. पुढील क्वालिफायर बॅचचे वर्ग सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू होतील. हा कार्यक्रम संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) न देता आयआयटी मद्रासमधून अभ्यास करण्याची अनोखी संधी प्रदान करतो. विद्यार्थी त्यांच्या कॅम्पस अभ्यासक्रमांसह प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्समध्ये डिप्लोमा करू शकतात. या डेटा सायन्स प्रोग्रामच्या पुढील बॅचसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट अशी आहे. इच्छुक विद्यार्थी https://ift.tt/393cB05 या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाद्वारे, आयआयटी मद्रास प्रक्रियेच्या काठीण्य पातळीशी तडजोड न करता, खूप मोठ्या संख्येने शिकणाऱ्यांना उच्च दर्जाची शिकण्याची संधी देत आहे, असे या प्रोग्रॅमचे प्रमुख प्रा. अॅण्ड्र्यू थंगराज यांनी सांगितले. ऑनलाइन क्लासेस आणि वैयक्तिकरित्या इनव्हिजिलेटेड परीक्षांचे संयोजन हे पूर्ण करते. प्रत्येक टप्प्यावर, विद्यार्थ्यांना कार्यक्रमातून बाहेर पडण्याचे आणि आयआयटी मद्रासकडून प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी मिळवण्याचे स्वातंत्र्य असेल. आयआयटी मद्रास प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्समध्ये डिप्लोमा ऑफर करते आणि वैयक्तिक मूल्यांकनासह ऑनलाईन कोर्स डिलीव्हरी शिकण्याचे एक अनोखे मॉडेल आहे जे जगातील हे पहिले प्रकार बनवते. आयआयटी मद्रास वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी कोर्स फीच्या ७५ टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करणार आहे. क्वालिफायर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकूण ७,११६ विद्यार्थी फाउंडेशन लेव्हलच्या पहिल्या बॅचमध्ये सामील झाले आहेत. फाउंडेशन लेव्हल पूर्ण केल्यानंतर नियमित प्रवेशाद्वारे विद्यार्थी डिप्लोमा स्तरामध्ये सामील होऊ शकतात. डिप्लोमा स्तरावर, विद्यार्थी एकतर प्रोग्रामिंगमध्ये डिप्लोमा किंवा डेटा सायन्समध्ये डिप्लोमा किंवा दोन्ही करू शकतात. कधीपासून सुरू होणार अभ्यासक्रम? अर्ज प्रक्रियेंतर्गत सर्व उमेदवारांना एका क्वालिफायर प्रक्रियेतून जावं लागेल. यात आयआयची मद्रास व्हिडिओ लेक्चर, असाइनमेंट आणि कोर्स प्रशिक्षकांसह लाइव्ह संपर्काच्या माध्यमातून चार आठवड्यांचं ऑनलाइन प्रशिक्षण देणार. ऑनलाइन असाइनमेंट पूर्ण झाल्यावर, विद्यार्थी क्वालिफायर परीक्षेला बसण्यास पात्र ठरतील. पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन स्तरावरील प्रवेश दिला जाईल. आयआयटी मद्रास हे अभ्यासक्रम सप्टेंबर २०२१ पासून सुरू करणार आहे. पात्रता काय? ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून २०१९ किंवा त्यापूर्वीच्या वर्षांमध्ये बारावी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि दहावीला गणित विषय घेतला असेल ते या कोर्ससाठी अर्ज करू शकतात. कोणतीही वयोमर्यादा नाही आणि कोणत्याही ठिकाणाहून उमेदवार हा अभ्यासक्रम शिकू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jJe13W
via nmkadda