Advertisement
Recruitment: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) मुंबई यांच्या प्रशासकीय विभागात रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरती अंतर्गत पदांच्या एकूण १४ जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. पात्रता निकष नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. बीटेक अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनची २ पदे, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी ३ पदे, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी २ पदे आणि मॅथेमॅटीक्स, फिजिक्स, मॅकेनिक्स या विषयात सहाय्यक प्राध्यापक पदाचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. तसेच एमटेकमध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी विषयात सहायक प्राध्यापद पदाच्या प्रत्येकी दोन जागा भरण्यात येणार आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचा आहे. आरक्षित उमेदवारांनी २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज करायला हवा. २७ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज पाठवायचा आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी उशा मित्तल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, वुमेन्स युनिवर्सिटी, जुहू कॅम्पस, मुंबई- ४०००४९ अर्ज पाठवायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mje5dN
via nmkadda