Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २३, २०२१ WIB
Last Updated 2021-08-23T11:43:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एसबीआयमधून शैक्षणिक कर्ज घेणे सोपे, केवळ 'या' कागदपत्रांची आवश्यकता Rojgar News

Advertisement
SBI : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो पण फी आणि शिक्षण खर्च बजेटच्या बाहेर असल्याने हे स्वप्न अर्धवट राहतं. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे बहुतांशजण या परिस्थितीतून जातात. अशावेळी हा एक पर्याय उरतो. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना उत्तम शिक्षण कर्जाची सुविधा देण्यासाठी SBI Global Ed-Vantage Overseas Education Loan घेऊन आली आहे. अभ्यासासाठी परदेशात जाणाऱ्यांसाठी हे कर्ज देण्यात येत आहे. काय आहे ही योजना? कोणत्याही परदेशी महाविद्यालय किंवा विद्यापीठात नियमित अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एसबीआयच्या या शैक्षणिक कर्जाची सुविधा मिळू शकते. याअंतर्गत रेग्यूलर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट किंवा डॉक्टरेटसारखे कोर्स करण्यासाठी कर्ज घेऊ शकता. विद्यार्थी यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूरोप, जपान, सिंगापूर, हॉंगकॉंग आणि न्यूझीलंडमधील कॉलेज किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन या संधीचा फायदा घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना साडेसात लाख ते दीड कोटीपर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाईल. व्याज दर एसबीआयच्या या कर्जावर तुम्हाला ८.५६ टक्के व्याजदर द्यावा लागेल. महिला उमेदवारांनाही ०.५० टक्के सवलत मिळेल. अभ्यास पूर्ण केल्याच्या ६ महिन्यांनंतर तुम्हाला कर्जाचे हप्ते भरावे लागतील. तुम्ही कर्जाची रक्कम १५ वर्षांमध्ये परत करू शकता. या शैक्षणिक कर्जाअंतर्गत, प्रवास खर्च, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, ग्रंथालय शुल्क आणि प्रयोगशाळा शुल्क यासारख्या खर्चांचा समावेश केला जाईल. या व्यतिरिक्त, पुस्तके, उपकरणे, साधने, गणवेश आणि कॉम्प्युटर संबंधित खर्च देखील समाविष्ट केला जाईल. या व्यतिरिक्त, प्रोजेक्ट वर्क, प्रबंध आणि २० टक्क्यांपर्यंत अभ्यास दौरा खर्च केला जाईल. बिल्डिंग फंड आणि परताव्यायोग्य ठेवी यासारख्या खर्चाचाही यामध्ये समावेश होतो. अर्ज कसा करावा? अर्ज करण्यासाठी, तुम्हाला SBI च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जिथे तुम्ही क्लिक नाऊ पर्यायावर जाऊन सर्व आवश्यक माहिती भरुन आपला अर्ज सबमिट करू शकता. अर्ज केल्यानंतर, विद्यार्थी I-20 व्हिसापूर्वी कर्ज मंजूर केले जाईल. तसेच, आयकर कलम ८० (ई) अंतर्गत कर सवलत देखील देण्यात येईल. तुम्हाला यासाठी दहावी, बारावी आणि पदवीच्या गुणपत्रकासह प्रवेश परीक्षेचा निकालही दाखवावा लागेल. याशिवाय, प्रवेश पुरावा म्हणून विद्यापीठाचे प्रवेश पत्र, ऑफर लेटर किंवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या खर्चाचा तपशील, फ्रीशीप किंवा स्कॉलरशीपची कॉपी, गॅप सर्टिफिकेट, बॉरोअर आणि गॅरेंटरचा एक पासपोर्ट साइट फोटो आणि ७.५० लाखापर्यंत कर्जासाठी अर्जदारासोबतच गॅरेंटरची असेट लॅबिलिटी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B5bpok
via nmkadda