Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २६, २०२१ WIB
Last Updated 2021-08-26T05:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

नामांकित कॉलेजांच्या जागा भरल्या; पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठांतर्गत कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली आहे. या यादीनंतर अनेक नामांकित कॉलेजांमधील जागा दुसऱ्या गुणवत्ता यादीतच पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे अनेक कॉलेजांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी तिसरी यादी जाहीर होणार नसल्याचे समजते. तर दुसऱ्या यादीतही काही कॉलेजांचे कला शाखेत जागा शिल्लक नसल्याने गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याचे समोर आले आहे. आता इतर कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण पाहावयास मिळणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना ३० ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीचे वेध लागले आहेत. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा यानंतर तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत, असे जाणकारांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून प्रवेश निश्चित केल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा खूप कमी होत्या. बुधवारी जाहीर झालेल्या यादीत बहुतांश कॉलेजांच्या जागा भरल्या असून शक्यतो तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नसल्याचे मत एका कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले. याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांची तिसरी यादी निश्चितपणे लागणार आहे असा दिलासाही या प्राचार्यांनी दिला. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सल्ला यंदा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा पार पडलेल्या नाहीत. यामुळे इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपरिक बीएसस्सीसाठी प्रवेश घेतला आहे. जेव्हा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राची प्रवेश प्रक्रिया पार पडेल त्यावेळस या जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजांत प्रवेश मिळालेला नाही. त्यांनी निराश न होता काही काळ प्रतीक्षा करावी असा सल्लाही प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांना दिला आहे. कट ऑफमध्ये १० टक्के वाढ कट ऑफमध्ये गतवर्षीपेक्षा १० ते १२ टक्क्यांची वाढ दिसत आहे. यामध्ये पहिल्या गुणवत्ता यादीमध्येच अनेक शाखांमध्ये जागा भरल्यामुळे बहुतांश शाखांमध्ये एकाही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नसल्याचे समोर आले आहे. काही नामांकित महाविद्यालयांची कट ऑफ टक्केवारी पुढीलप्रमाणे - साठ्ये कॉलेज बीए - ७३..५ बीकॉम - ८७.१६ बीएससी - ८६.६६ बीएससीआयटी : गणित विषयातील गुण - ८२ .... पोद्दार कॉलेज बीकॉम - ९५.६७ बीएमएस : आर्टस् -९३.०४ सायन्स - ९३.६७ कॉमर्स - ९६.५ इतर - ८८.८३ ... रुईया कॉलेज बीए (इंग्रजी माध्यम) - ९५ बीएस्सी - ८४ बीएस्सी (कम्पुटर सायन्स) - ९२.८० बीएमएम आर्टस् -९५% कॉमर्स -९३.६७% सायन्स - ९२.१७% ... विल्सन कॉलेज बीए - ९१.८ बॅफ - ९१.३३ बीकॉम - ८७.२ बीएससी आयटी - ८७.६७ बीएमएम : आर्ट्स - ९३ कॉमर्स - ९३.६७ सायन्स - ९०.८३ ... सेंट झेविअर्स कॉलेज जीवशास्त्र - एचएससी बोर्ड - ९०.५० इतर बोर्ड - ९१ .... डहाणूकर कॉलेज बीकॉम - ८४.६६ बीएमएस : कॉमर्स - ८८.३३ सायन्स - ७२.१६ बॅफ - ८८.१६ बीबीआय - ७७.५० बीएफएम - ८२.०५ बीएस्सीआयटी : गणित विषयातील गुण - ६३ ... रुपारेल कॉलेज बीए - ८८ बीकॉम- ९०.८३ बीएससीआयटी : गणित विषयातील गुण - ८२ बीएमएस : कॉमर्स - ८८.१६ बीएससी (कम्पुटर सायन्स) - ८२.३३ ... हिंदुजा कॉलेज बीकॉम - ९०.३२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ktuU2Y
via nmkadda