Advertisement
NRDA 2021: भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मंत्रालयाच्या नॅशनल रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एजन्सी (NRDA) ने विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार यांचा पूर्ण तपशील देण्यात आला आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण १० रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एजन्सीच्या जाहिरातीनुसार, आयटी प्रोडक्ट मॅनेजर आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. NRDA द्वारे जाहिरात केलेल्या पदांची नियुक्ती ही विशिष्ट कालावधीसाठी केली जाणार आहे. पदांचा तपशील संयुक्त संचालक (पी/टी) - २ पदे उपसंचालक (पी/टी) - १ पद सहाय्यक संचालक (पी/टी) - १ पद वरिष्ठ सल्लागार (तांत्रिक) - २ पदे डेटा सायंटिस्ट - १ पोस्ट प्रोडक्ट मॅनेजर आयटी - १ पद प्लानिंग आणि जीआयएस लीड - २ पद वाहतूक आणि वाहतूक नियोजन अभियंता - १ पद पदांनुसार पात्रता सह संचालक (पी/टी), उपसंचालक (पी/टी) आणि सहाय्यक संचालक (पी/टी) - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव. डेटा सायंटिस्ट - अर्थशास्त्र, गणित, कॉम्प्युटर सायन्स किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवीसह ३ वर्षांचा अनुभव. वरिष्ठ सल्लागार (तांत्रिक) - सिव्हिल इंजिनीअरींगमध्ये पदवी आणि १० वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ३५ वर्षे. प्रॉडक्ट मॅनेजर IT - BE किंवा B.Tech किंवा मास्टर्स डिग्री, डिप्लोमा इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन. सायन्स किंवा IT आणि ICT यापैकी काही सोबत ५ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ३५ वर्षे. नियोजन आणि जीआयएस लीड - सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी किंवा संबंधित विषयात मास्टर्स आणि ६ वर्षांचा अनुभव. वाहतूक आणि वाहतूक नियोजन इंजिनीअरिंग - सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एनआरडीएची अधिकृत वेबसाइट pmgsy.nic.in वर जाऊन तसेच बातमी खाली देण्यात आलेल्या थेट लिंकवर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एनआरडीए वेबसाइटवर दिलेल्या नमुन्यानुसार पीडीएफ स्वरूपात nridavacancies@gmail.com वर पाठवायचा आहे. ऑनलाईन अर्जाची तसेच ईमेलद्वारे पीडीएफ मेल करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२१ आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kk1ILK
via nmkadda