Advertisement
FYJC Admission 2021: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी कट ऑफची पहिली यादी () २७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे ३.०६ लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. FYJC गुणवत्ता यादी या फेरीत जाहीर केली जाईल तसेच नवीन अर्ज स्वीकारले जातील. सोबतच पुढे आणखी तीन फेऱ्या देखील होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटनुसार, 'प्रवेश फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी २७ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. यानंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल. ही फेरी MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील महामंडळाच्या भागातील अकरावी प्रवेशासाठी आहे. MMR हे मुंबई महानगर क्षेत्र आहे.' शिक्षणमंत्र्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले, 'एमएमआर आणिइतर क्षेत्रांसाठी FYJC 2021-22 मध्ये केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या सामान्य फेरीसाठी नोंदणी आणि पात्र अर्जांची स्थिती खालीलप्रमाणे आहे: अमरावतीमध्ये, नोंदणीची एकूण संख्या १० हजार ६७३ होती, त्यापैकी ८ हजार १५८ अर्ज स्वीकारले गेले. मुंबईत नोंदणीची एकूण संख्या २ लाख ३७ हजार ९५२ असून यामधील २ लाख २ हजार ५८ अर्ज स्वीकारले गेले. नागपूर विभागात एकूण २७ हजार २३९ नोंदणी झाल्या त्यापैकी १९ हजार २५६ अर्ज स्वीकारले गेले. नाशिक विभागात नोंदणीची एकूण संख्या २२ हजार २११ होती त्यापैकी १६ हजार ७५३ अर्ज स्वीकारले गेले आणि पुण्यात एकूण ७७ हजार २७६ अर्ज दाखल झाले त्यापैकी ५९ हजार ८८६ अर्ज स्वीकारले गेले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3De5hvN
via nmkadda