Advertisement
NPCIL : ऑफ इंडिया (NPCIL) मध्ये ट्रेड अॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एनपीसीआयएल अप्रेंटिस भरती २०२१ साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि १३ सप्टेंबर २०२१ पर्यंत चालणार आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात ठेवा. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनुसार फिटरची ३० पदे, टर्नरची ०४पदे आणि मशिनिस्टच्या ०४ पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच इलेक्ट्रीशियनच्या ३० आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या ३० पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर वेल्डरची ०४ पदे आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची ०५ पदे भरले जाणार आहेत. NPCIL Recruitment 2021: ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची वेबसाइट https://ift.tt/2Wl4OXE किंवा https://ift.tt/1V9hqYa वर स्वतःची नोंदणी करावी. उमेदवारांना या लिंकच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. वयोमर्यादा ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १४ वर्षे असावे. याशिवाय पदांसाठी कमाल वय २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WvKzqu
via nmkadda