Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २८, २०२१ WIB
Last Updated 2021-08-28T05:43:56Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'६८ टक्के विद्यार्थ्यांचा आपल्याच देशात उच्च शिक्षण घेण्याकडे कल' Rojgar News

Advertisement
Higer : अकरावी आणि बारावीच्या ३ हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास ६८ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या देशात घेण्यास प्राधान्य दिले आहे. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्के जास्त आहे. 'स्टुडंट क्वेस्ट सर्वे रिपोर्ट' या सर्वेक्षणात, भारत आणि दक्षिण आशियातील २ हजार शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या ६ हजार सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूणच सर्व्हेक्षण पाहता यावर्षी एकूण विद्यार्थ्यांपैकी २५ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत चार टक्के कमी आहे. करोना काळाचा परिणाम इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रावरही झालेला पाहायला मिळतो. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, प्रवासाचे निर्बंध यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्थिरता दिसून येते. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या बाबतीतही मोठी झेप घेताना विद्यार्थी विचार करुन पाऊल टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे सर्वेक्षण शिव नादर विद्यापीठ, नोएडा आणि इंटरनॅशनल करिअर अँड कॉलेज काऊन्सिलिंग (IC3) इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेने केले. ही संस्था हायस्कूल मॅनेजमेंट, शिक्षक आणि समुपदेशकांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण साहित्याच्या माध्यमातून जगभरातील उच्च माध्यमिक शाळांना सहकार्य करते. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांपैकी ४९ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या देशात शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य दिले. तर २४ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणाबाबतीत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार, विद्यार्थी हायस्कूलमध्येच त्यांच्या करिअर आणि संबंधित नोकरीच्या शक्यतांबद्दल विचार करू लागतात. सर्वेक्षण अहवालात म्हटल्यानुसार, '७१ टक्के विद्यार्थ्यांनी आधीच त्यांच्या भविष्यातील रोजगाराचा विचार सुरू केला आहे. प्लेसमेंट रेकॉर्ड, रँकिंग आणि संस्थेचे प्रोग्राम डिझाईन हे विद्यापीठ निवडण्याचे पहिले तीन घटक आहेत. फीस ही चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर प्राध्यापकांची गुणवत्ता यामध्ये होती. ८३ टक्के विद्यार्थी शिक्षणाची गुणवत्ता हे दुसऱ्या देशात शिकण्याचे सर्वात मोठे कारण मानतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BexQao
via nmkadda