Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २८, २०२१ WIB
Last Updated 2021-08-28T12:43:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आता संरक्षण क्षेत्रात एमटेक, पीएचडी करण्याची संधी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे देशातील ४० शिक्षणसंस्थांमध्ये '' अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितले. संरक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच, नव्या प्रणालीच्या निर्मितीसाठी साधारण ५०० विद्यार्थी संरक्षण क्षेत्रात 'पीएचडी' करणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण मंत्रालयाशी चर्चा सुरू आहेत, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट (आयडीएसटी) पुणे शाखा यांच्यात करार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. रेड्डी बोलत होते. या करारानुसार विद्यापीठात पीजी डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या वेळी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, 'डीआयएटी'चे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायण, 'आयडीएसटी'चे अध्यक्ष डॉ. सी. एल. धामेजनी उपस्थित होते. रेड्डी म्हणाले, 'संरक्षण विभागातील संशोधन, विकास कामांसाठी कुशल मनुष्यबळ, अभ्यास गटांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने एमटेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात देशातील ४० शैक्षणिक संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होईल. देशात संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे.' 'डीआरडीओ देशी बनावटीचे संरक्षण साहित्य निर्माण करण्यासह भविष्यवेधी तंत्रज्ञान विकसनावर भर देत आहे. त्यासाठी अकराशे कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. देशातील तीनशे विद्यापीठे, नवउद्यमी डीआरडीओसह काम करत आहेत. कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामुळे भारत संरक्षण संशोधन आणि तंत्रज्ञानात मागे राहणार नाही,' असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले. 'मानवविरहित वाहने लवकरच' 'भविष्यवेधी तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन जमिनीवरील मानविरहित वाहने विकसित करण्यात आली आहेत. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) संशोधन सुरू आहे. त्यासाठी अभ्यासक्रमही राबवण्यात येत आहेत. देशभरात संरक्षणविषयक तंत्रज्ञानाचे संशोधन सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात भारत संरक्षण संशोधन तंत्रज्ञान विकसनात मागे राहणार नाही,' असेही डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी स्पष्ट केले. 'नव्या संशोधकांसाठी पाच प्रयोगशाळा' 'देशाच्या संरक्षण साहित्याच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. दोन हजारांपेक्षा जास्त कंपन्या नवे तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करीत आहेत, तर १० हजारांपेक्षा अधिक कंपन्या तिसऱ्या स्तरातील कामे करत आहेत. अनेक नवउद्यमी संरक्षण विभागाशी जोडल्या गेल्या आहेत. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार ३५ वर्षांखालील तरुण संशोधकांसाठी पाच प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. अशा अभ्यासक्रमांतून कुशल मनुष्यबळ विकसित होण्यास मदत होईल. देशातील अनेक नवउद्यमी संरक्षण तंत्रज्ञान विकसनासाठीचे संशोधन करत आहेत. मंत्रालयाकडून नवउद्यमींना पाठबळ देण्यात येत आहे. त्या दृष्टीने नवउद्यमींना एक कोटी ते दहा कोटींपर्यंतच्या निधींच्या योजना सुरू करण्यात आल्या,' असे डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर नवनवीन अभ्यासक्रम देण्यात कायमच अग्रेसर आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल. - डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचे... पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी कालावधी : एक वर्ष पात्रता : अभियांत्रिकी किंवा विज्ञान विषयातील पदवीधर सेमिस्टर : दोन श्रेयांक : ३२ अधिक माहिती : www.unipune.ac.in


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jpmOJv
via nmkadda