Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून मागील महिन्याभरापासून सुरू करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच 'आयटीआय'मधील प्रवेशासाठी आत्तापर्यंत दोन लाख २६ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून यातील एक लाख ९८ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कन्फर्म केले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा सरकारी 'आयटीआय'मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असल्याने यामुळे खासगी 'आयटीआय'मध्ये जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात ४१७ सरकारी आणि ५४९ खासगी 'आयटीआय' संस्थांमध्ये असलेल्या विविध ट्रेडसाठी १५ जुलैपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या 'आयटीआय'मध्ये १ लाख ४८ हजार २९६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणचे संचालनालयाने दिली. यावेळीही राज्यातील सरकारी 'आयटीआय'ला विद्यार्थ्यांची पसंती अधिक आहे. त्यामुळे काही ठराविक शहरांमध्ये असलेल्या खासगी 'आयटीआय'मध्ये यंदाही प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता 'असोसिएशन ऑफ नॉन गर्व्हमेंट आयटीआय' या संघटनेचे सचिव देवेंद्र पाटणे यांनी व्यक्त केली. जागा रिक्त राहण्यापूर्वीच त्याबाबत उपयोयाजनाही केल्या जाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आत्तापर्यंत झालेली नोंदणी एकूण नोंदणी २,२६,१७० अर्ज भरून पूर्ण १,९८,६७२ शुल्क भरलेले १,९२,८३५
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mqiD28
via nmkadda