Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २१, २०२१ WIB
Last Updated 2021-08-21T10:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

करोना काळात ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनलेयत करिअरचे मार्ग, जाणून घ्या Rojgar News

Advertisement
Career Guidance: करोनामुळे अनेक गोष्टी आता ऑनलाईन झाल्या आहेत. यामुळे करिअरचे पर्यायही मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन झाले आहेत. शिक्षणापासून करिअर पर्यंत बहुतेक क्षेत्रे आता पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. या ऑनलाईन नोकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांकडे डिजिटल कौशल्ये असणे खूप महत्वाची आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर असलेल्या नवीन करिअर संधीबद्दल आपण जाणून घेऊया ई-कॉमर्स (E-Commerce) करोनामुळे बहुतेक व्यवसाय आता ऑनलाइन केले जात आहेत. यामुळे, बाजारात ई-कॉमर्स व्यवसाय, सप्लाय चेन असोसिएशन, पॅकेज हँडलर आणि वैयक्तिक खरेदीदारांना खूप मागणी आहे. या क्षेत्रात वेळ टाइम मॅनेजमेंट, ग्राहक सेवा आणि नेतृत्व कौशल्ये असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. डेटा सायन्स (Data Science) आजकाल, जवळजवळ सर्व लहान आणि मोठ्या कंपन्यांना डेटा गोळा करुन त्याचे विश्लेषण (Analysis) करण्यासाठी डेटा सायंटिस्ट आणि डेटा विश्लेषक आवश्यक असतो. हे तज्ञ कंपन्यांना विविध प्रकारच्या संकलित डेटामधून इच्छित परिणाम देतात. यामुळे कंपनीचे नवीन प्रकल्प तयार होण्यास मदत होते आणि कंपन्यांचा नफाही वाढतो. या व्यावसायिकांकडे टेन्सर फ्लो, स्टॅटिसिकल मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशनची कौशल्ये असणे आवश्यक असते. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) जवळजवळ सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वस्तू किंवा सेवांची खरेदी आणि विक्रीची कमाई डिजिटल मार्केटिंग व्यावसायिकांच्या हातात असते. म्हणूनच तुम्ही इथे डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझर स्पेशालिस्ट म्हणून काम करू शकता. डिजिटल स्टॅटर्जी, प्रोडक्ट मार्केटिंग आणि ब्रँड व्यवस्थापनाची कौशल्ये या क्षेत्रासाठी खूप महत्वाची आहेत. ई-शिक्षण (E-Education) करोनाकाळात शाळेपासून कॉलेजपर्यंत सर्व ठिकाणचे शिक्षण आता सर्वत्र पूर्णपणे ऑनलाइन झाले आहे. या क्षेत्रामध्ये अध्यापन सहाय्यक, शालेय शिक्षक, प्राध्यापक आणि करिक्यूलर डेव्हलपरची मागणी देखील खूप वाढली आहे. यासोबतच डिजिटल स्ट्रॅटर्जी, लेसन प्लानिंग आणि टाइम मॅनेजमेंट प्रोफेशनल्सची आजकाल मोठी मागणी आहे. हेल्थकेअर मॅनेजमेंट (Healthcare Management) करोनाकाळा हेल्थकेअर हे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. हेल्थकेअर व्यावसायिकांसाठी सपोर्ट स्टाफ खूप महत्वाचे आहे. हेल्थकेअर असिस्टंट, फार्मसी टेक्निशियन, डेंटल असिस्टंट, लॅब असिस्टंट आणि होम हेल्थ केअर असिस्टंट इ. या सर्व व्यावसायिकांना रुग्ण शिक्षण आणि डेटा एंट्रीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या व्यावसायिकांना मुख्यतः वैद्यकीय चिकित्सकांसोबत काम करावे लागते. मेंटल हेल्थ स्पेशलायझेशन (Mental Health Specialization) करोना काळात स्वत:च्या मानसिक आरोग्याबद्दल सर्वजण जागरुक झाले. यानंतर अनेकजण ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन मानसिक आरोग्याबाबत जागरूकता पसरुन सहकार्य करत आहेत. या काळात मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स, बिहेवियरल थेरपिस्ट आणि सायकोथेरपिस्ट इत्यादींची मागणीही वाढली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3go5P8r
via nmkadda