Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २०, २०२१ WIB
Last Updated 2021-08-20T10:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दिल्ली विद्यापीठाचे अफगाण विद्यार्थ्यांना सर्वतोपरि मदतीचे आश्वासन; विद्यार्थ्यांची घेतली बैठक Rojgar News

Advertisement
तालिबान ()ने अफगाणिस्तानवर () नियंत्रण मिळवल्यानंतर देशात शिकत असलेले अफगाण विद्यार्थी भीतीच्या छायेखाली आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर भारताकडे येथील नागिरकत्वदेखील मागितले आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्ली विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पी.सी. जोशी ( Acting Vice-Chancellor PC Joshi) यांनी गुरुवारी अफगाण विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचा विश्वास दिला. डीन, स्टूडेंट्स वेलफेयर एंड फॉरेन स्टूडंट्स रजिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काही दिवसांनी अफगाण विद्यार्थ्यांची बैठक घेतली होती. या दरम्यान प्रभारी कुलगुरूंनी अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. दिल्ली विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये सुमारे २०० अफगाणी विद्यार्थी शिकत आहेत. यापैकी अनेक जण करोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे आपापल्या घरी परतले होते. गुरुवारच्या बैठकीत सुमारे ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. मिडीया रिपोर्टनुसार, विद्यापीठाने एक निवेदन जारी केले आहे. यात असे म्हटले आहे की, 'बैठकीत अफगाण विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील सद्य स्थितीविषयी माहिती दिली आणि आपल्या समस्या मांडल्या, आपल्या मनातील भीती व्यक्त केली. याव्यतिरक्त अफगाण विद्यार्थ्यांनी व्हिसा मुदतवाढ, आयसीसीआर शिष्यवृत्ती, होस्टेल सुविधा, आर्थिक समस्या आदींविषयी देखील चर्चा केली. यादरम्यान, कुलगुरू जोशी यांनी या विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की विद्यापीठ त्यांना शक्य ती सर्व मदत आणि सहकार्य करणार आहे. डीयू आपल्या अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j2osR5
via nmkadda