Advertisement
initiative for : चित्रपट अभिनेता याची 'देशाचे मेंटोर' मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली. दिल्ली सरकारच्या पुढाकाराने 'देशाचे मेंटोर' मोहिमेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देताना सोनू सूद म्हणाला, 'आज लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा मोठी सेवा नाही. मला खात्री आहे की आपण एकत्र मिळून करू शकतो आणि आपण करुच' दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, 'सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले अत्यंत गरीब कुटुंबातून येतात. या मुलांच्या कुटुंबात त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी खूप कमी लोक असतात. अशा परिस्थितीत, आम्ही देशातील सुशिक्षित लोकांना आवाहन करत आहोत की तुम्ही पुढे या आणि सरकारी शाळेतील एक, दोन, तीन किंवा जास्तीत जास्त मुलांचे मार्गदर्शक व्हा. त्यांना फोनवर मार्गदर्शन करा. मुले देखील फोन करुन तुमच्या संपर्कात राहतील. आपण तणावपूर्ण परिस्थितीतही त्यांना मार्गदर्शन करू शकतो. 'सोनू सूद देशाचे मेंटोर मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनण्यास तयार आहे. तो स्वतः काही मुलांना मार्गदर्शन करेल आणि देशभरातील लोकांना मार्गदर्शक होण्याचे आवाहन करेल', असेही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत उद्घाटन मोहिमेबद्दल बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, 'देशाचे मेंटोर' 'हा उपक्रम सध्या गेल्या दीड वर्षांपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून चालत होता. हा पायलट प्रोजेक्ट खूप यशस्वी झाला. या मोहिमेशी संबंधित सर्व मार्गदर्शकांना उत्तम अनुभव होता आणि मुलांनाही एक चांगला अनुभव मिळाला. आता काही दिवसांनी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत याचे उद्घाटन करण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gBIDUp
via nmkadda