Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-02T08:43:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार? हायकोर्टाने सीबीएसईकडे मागितले उत्तर Rojgar News

Advertisement
10th Private Exam 2021: दहावीची परीक्षा करोनामुळे रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने त्यांचा निकाल लावण्यात येणार आहे. याच अनुशंगाने सीबीएसई दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांनी आपल्या निकालासाठी कोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने सीबीएसई बोर्डाकडे याचे उत्तर मागितले आहे. सीबीएसईने यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला असून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. न्या. प्रतिक जालान यांनी सीबीएसई दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या मागणीची याचिका दाखल केली. त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी कोर्टाकडून वेळ मागितला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या वतीने वकील रुपेश कुमार यांनी दहावी परीक्षेत खासगी विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाच्या कार्यप्रणालीच्या निर्देशासाठी दहा दिवसांचा वेळ मागितला होता. हे प्रकरण मुलांच्या भविष्याशी संबंधित आहे. यासाठी सीबीएसईला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला जातोय, असे कोर्टाने यावेळी म्हटले. याप्रकरणी पुढची सुनावणी २३ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे. या याचिकेवर सीबीएसईला जूनमध्ये नोटीस देण्यात आली होती. ज्यामध्ये हायकोर्टने सीबीएसईला उत्तर देण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर सीबीएसईने कोर्टाकडे आणखी एकदा वेळ देण्याची विनंती केली. जी कोर्टाकडून स्वीकारण्यात आली. आपल्या याचिकेत एका विद्यार्थ्याचीआई पायल बहल यांनी म्हटले, सीबीएसईने परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना पास केले पण खासगी विद्यार्थ्यांनाा कसे गुण दिले जातील या धोरणासंबंधी कोणती अधिसूचना जाहीर केली नाही. त्यामुळे सीबीएसची खासगी विद्यार्थ्यांप्रतीची वर्तणूक ही भारताचे संविधान कलम १४ चे प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन आहे. ज्यामुळे शिक्षणासोबत पुढे जाण्याचा अधिकार काढून घेण्यात आलाय. खासगी विद्यार्थ्यांसाठी होणारी परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होऊन १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. रिझल्टची घोषणा देखील कमीत कमी वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांचे कॅम्पेन सीबीएसई बारावीचे खासगी आणि सेकंड कंपार्टमेंटचे साधारण १ लाख विद्यार्थी या परीक्षेला विरोध करत आहे. नियमित विद्यार्थी आणि आमच्यात फरक करुन नये. आम्हाला देखील प्रमोट केले जावे अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. गेले काही दिवस विद्यार्थी यासाठी ट्वीटरवर कॅम्पेन देखील चालवत आहेत. सीबीएसई बोर्डाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हातात फलक घेऊन आंदोलन देखील केले होते. याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3flLBvB
via nmkadda