Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत एमबीए शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा () घेतली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. मुक्त विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या या शिक्षणक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देण्याची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे माहिती जाहीर केली जाणार आहे. तसेच प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित अभ्यास केंद्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. विद्यापीठामार्फत अद्यापही सीईटीच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नसून, त्याबाबत स्वतंत्रपणे ऑनलाइन सूचना जाहीर केली जाणार आहे. तसेच बीएड विशेष शिक्षण या शिक्षणक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशासाठीही विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. या शिक्षणक्रमासाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UNmLO2
via nmkadda