Advertisement
Recruitment 2021: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (, SAI) मध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने प्रशिक्षकाच्या एकूण १०० पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI)या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. प्रशिक्षकांची भरती चार वर्षांच्या प्राथमिक कालावधीसाठी केली जाणार आहे. वार्षिक कामगिरी मूल्यांकनाच्या आधारे या कालावधीसाठी ही भरती होईल. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युडो, कबड्डी, रोइंग, शूटिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, ताइक्वांडो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती यासह २१ विविध क्रीडा प्रकाराच्या प्रशिक्षकपदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज अधित वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sportsauthorityofindia.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन नीट वाचून घ्यावे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की SAI, NS NIS, किंवा कोणत्याही अन्य मान्यता प्राप्त भारतीय / परदेशी विद्यापीठातून Coaching मध्ये डिप्लोमा करणारे असे उमेदवार ज्यांनी ऑलिम्पिक / वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पदक मिळवले आहे किंवा दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे, यासह राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भागत घेतला आहे, किंवा द्रोणाचार्य पुरस्कार मिळवला आहे, असे उमेदवारा या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. SAI मार्फत जारी नोटिफिकेशन नुसार, उमेदावारांना हे सूचित केले जाते की मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी, तारीख आणि मुलाखतीचे ठिकाण अधिकृत वेबसाइट वर पोस्ट केले जाईल. म्हणूनच उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी. निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येईल. या व्यतिरिक्त निवड प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kHMwbu
via nmkadda