Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २८, २०२१ WIB
Last Updated 2021-08-28T12:43:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC CGL परीक्षेची उत्तरतालिका लवकरच होणार जारी Rojgar News

Advertisement
2021: SSC CGL टियर 1 उत्तर तालिका की लवकरच जाहीर केली जाणार आहे. १३ ते २४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात, यासाठी आपले लॉगिन तपशीलांचा वापर करून ssc.nic.in वरून डाउनलोड करू शकतील. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की जर त्यांना असे वाटत असेल की त्यांचे उत्तर नीट तपासले नाही तर ते त्यासाठी हरकत नोंदवू शकतात. महत्त्वाच्या तारखा CGL 2021 परीक्षा - १३ ऑगस्ट- २४ ऑगस्ट २०२१ CGL उत्तरतालिका - लवकरच तारीख जाहीर केली जाईल SSC CGL उत्तरतालिका डाऊनलोड कशी कराल? SSC CGL उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील आन्सर की टॅबवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. तेथे SSC CGL उत्तरतालिकेसंबंधी तपशील उपलब्ध होईल. त्यानंतर लिंकवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना SSC CGL लॉगिन तपशील द्यावा लागेल. त्यानंतर SSC CGL टियर 1 आन्सर की स्क्रीनवर प्रदर्शित होईल. उमेदवार त्यांची उत्तरे तपासू शकतात. यानंतर, उमेदवार त्यांच्या फॉर्मची प्रिंटआऊट घेऊन ठेवू शकतात. एसएससी सीजीएल परीक्षा मे-जूनमध्ये होणार होती पण भारतात कोविड -१९ महामारीच्या परिस्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ती ऑगस्टसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली. या दरम्यान, उमेदवारांना कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी फेस मास्क अनिवार्य होता. याशिवाय उमेदवारांना हँड सॅनिटायझर आणण्यास सांगितले होते. यासह, केंद्र सरकारने जारी केलेल्या परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली. एसएससी विविध मंत्रालय/विभाग/संघटनांमध्ये गट 'ब' आणि गट 'क' पदांसाठी सीजीएल परीक्षा आयोजित करते. परीक्षा आणि निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XZjwEp
via nmkadda