Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-08-04T08:43:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC CGL Tier 1 Admit Card 2020: सीजीएल टियर १ परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर Rojgar News

Advertisement
Admit Card 2020: एसएससी सीजीएल (टियर १) परीक्षा २०२० ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (एसएससी) ने संयुक्त पदवी स्तर (सीजीएल) टीयर १ परीक्षा २०२० साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. आयोगातर्फे एसएससी सीजीएल टियर १ प्रवेश पत्र ३ ऑगस्ट २०२१ ला वेगवेगळ्या रिजनच्या वेबसाइटवर जाहीर केले गेले आहे. १३ ते २४ ऑगस्टपर्यंत कर्मचारी निवड आयोगद्वारे देशभरात नियोजित केलेल्या विविध परीक्षा केंद्रांवर संयुक्त पदवी स्तरीय (सीजीएल) टीयर १ परीक्षा २०२०चे आयोजन १३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान केले जाणार आहे. याआधी परीक्षेचे आयोजन मार्च २०२१ मध्ये करण्यात आले होते. पण देशभरात करोनाचा प्रादुर्भाव आणि दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. त्यानंतर २ जुलैच्या या तारखेची घोषणा करण्यात आली होती. सीबीटी माध्यमातून होणार परीक्षा एसएससी द्वारे सीजीएल टियर १ परीक्षेचे आयोजन सीबीटी ( कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) माध्यमातून केले जाणार आहे. परीक्षेसाठी एक तासांचा वेळ दिला जाणार आहे. परीक्षेमध्ये जनरल इंटेलीजन्स अॅण्ड रिजनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटीव्ह अॅप्टीट्यूड आणि इंग्रजी कॉम्प्रीहेंशन विषयाचे २५-२५ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला २ गुण आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुणांचे निगेटीव्ह मार्कींग आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ynjIe0
via nmkadda