Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २५, २०२१ WIB
Last Updated 2021-08-25T10:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Teachers Day 2021: देशातील शिक्षकांना केंद्र सरकारचे गिफ्ट Rojgar News

Advertisement
Techers Day 2021: आगामी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शिक्षक वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. शाळातील शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण होणार आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे सध्या पाठवण्यात आलेल्या लसींच्या व्यतिरिक्त २ कोटी लस अतिरिक्त पाठवण्यात येणार आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारतर्फे शिक्षकांना गिफ्ट देण्यात आले आहे. देशातील करोना केसेसचे प्रमाण कमी होत असताना अनेक राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकवर्गाला शाळेत येता येणार आहे. दरम्यान शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर २ कोटी अतिरिक्त लस देशभरात देण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्रावर शिक्षक वर्गाला प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आगामी शिक्षक दिन ५ सप्टेंबरपूर्वी सर्व शाळांतील शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या लसींच्या व्यतिरिक्त २ कोटी उपलब्ध होणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे आभार मानतो. करोनाच्या विरुद्ध आमची भविष्यातील पिढी सुरक्षित करण्यासोबतच महामारीत अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. सर्व राज्यांनी आपल्या भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी या मोहिमेत आपले सहकार्य आणि समर्थन द्यावे असे आवाहन धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gxjdqP
via nmkadda