Advertisement
AIBE 2021: ऑल इंडिया बार एक्झामच्या (AIBE) नोंदणीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आता २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येत होती. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केली नाही ते AIBE ची अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. सुधारित वेळापत्रकानुसार, परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. उमेदवार ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ही परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. मात्र, प्रवेशपत्र केव्हा दिले जाईल याची माहिती अद्याप देण्यात आली नाही. यापूर्वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र ४ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार होते. ऑल इंडिया बार परीक्षेविषयी ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE)ही राष्ट्रीय स्तरावरील कायद्याची परीक्षा आहे. भारतात कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रॅक्टीससाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विधी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. याशिवाय अंतिम वर्षाचे विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. यापूर्वी ऑल इंडिया बार परीक्षा XV (AIBE-XV) २४ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातील ५२ शहरांमधील १४० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. ज्यात सुमारे १ लाख २० हजार वकील उपस्थित होते. AIBE १६ परीक्षेसाठी अशी करा नोंदणी स्टेप १ : सर्वातआधी अधिकृत वेबसाइटवर allindiabarexamination.com वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: त्यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा. स्टेप ४: लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. स्टेप : फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. स्टेप ५: त्यानंतर अर्ज फी भरा स्टेप ६: प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या. बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI) बद्दल बार काऊन्सिल ऑफ इंडिया ही भारतातील एक व्यावसायिक नियामक संस्था आहे. जी भारतातील कायदेशीर व्यवसाय आणि कायदेशीर शिक्षणाचे नियमन करते. ही एक स्वायत्त संस्था आहे. ही परिषद व्यावसायिक आचरण आणि शिष्टाचार आणि कायदेशीर शिक्षणाची मानके ठरवते. अधिवक्ता अधिनियम १९६१ च्या कलम ४ अंतर्गत भारतीय बार काऊन्सिलची स्थापना झाली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nzx1Wc
via nmkadda