इग्नूकडून AICTE मान्यताप्राप्त मॅनेजमेंट कोर्सेसंदर्भात महत्वाची अपडेट Rojgar News

इग्नूकडून AICTE मान्यताप्राप्त मॅनेजमेंट कोर्सेसंदर्भात महत्वाची अपडेट Rojgar News

IGNOU : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने मान्यताप्राप्त मॅनेजमेंट अभ्यासक्रमांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यताप्राप्त व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर ऑफ बिझनेस (बँकिंग आणि फायनान्स) (एमबीएफ) साठी अर्ज करणारे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकणार आहेत. ३० सप्टेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी या मुदतीपर्यंत अर्ज करु शकतात. या मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. या अभ्यासक्रमांशी संबंधित तपशील कोर्ससाठी लागणारी पात्रता, कालावधी, शुल्क, अभ्यासक्रम या संदर्भातील सविस्तर माहिती ऑनलाइन प्रवेश पोर्टल ignouadmission.samarth.edu.in वर उपलब्ध आहे. एमबीए प्रोग्राम व्यतिरिक्त, मॅनेजमेंटतर्फे इतर अनेक पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यानुसार पीजी डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (पीजीडीएमएम), पीजी डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम), पीजी डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (पीजीडीएचआरएम) आणि पीजी डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट (पीजीडीओएम) यांचा समावेश आहे. या पीजी डिप्लोमा कोर्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी जून २०२१ मध्ये संपली आहे त्यांच्या नोंदणीची वैधता वाढविण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार, करोना साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नोंदणी प्रक्रिया जूनमध्ये संपली. यानंतर विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या किंवा शेवटच्या सेमिस्टरच्या अशा सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी वैधता डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kNOirD
via nmkadda

0 Response to "इग्नूकडून AICTE मान्यताप्राप्त मॅनेजमेंट कोर्सेसंदर्भात महत्वाची अपडेट Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel