Amazon मध्ये ५५ हजारहून जास्त जागांवर भरती, माहितीसाठी 'या' लिंकवर क्लिक करा Rojgar News

Amazon मध्ये ५५ हजारहून जास्त जागांवर भरती, माहितीसाठी 'या' लिंकवर क्लिक करा Rojgar News

: अॅमेझॉन ही आघाडीची ई कॉमर्स कंपनी जगगभरात नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. अॅमेझॉन कॉर्पोरेट आणि टेक्नोलॉजी स्तरावर ५५ हजार जणांना नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. Amazonचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जेसी यांनी या भरतीबाबत माहिती दिली आहे. कंपनीला रिटेल, क्लाउड आणि जाहिरातींसह इतर व्यवसायांमधील गरजपूर्ण करण्यासाठी अधिक नोकरदारवर्गाची गरज आहे. आवश्यकता आहे. अमेरिकेत ४० हजार नोकऱ्या जेसीने जाहीर केले की, या ५५ हजार नोकऱ्यांपैकी ४० हजारांहून अधिक नोकऱ्या अमेरिकेत असतील. तर उर्वरित नोकऱ्या भारतासह जर्मनी आणि जपान सारख्या देशामध्ये उपलब्ध होतील. जॉब फेअर 'अॅमेझॉन करिअर डे'द्वारे ही भरती केली जाणार असल्याचे जेसीने म्हटले. . Amazonमधील नोकऱ्यांची अधिक माहिती अधिकृत वेबसाइट amazon.jobs/in वर मिळू शकले. 'अॅमेझॉन करिअर डे' सुरु अॅमेझॉन करिअर डे (Amazon Career Day)१६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल.हा एक विनामूल्य कार्यक्रम आहे. कंपनीने एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले की, हा संवादात्मक कार्यक्रम नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी खुला आहे. उमेदवारांचा त्यांच्या क्षेत्रातील अनुभव, व्यावसायिक क्षेत्राची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी आणि तुम्हाला इथे काम करायचे असले किंवा नसले तरीही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. अशी करा नोंदणी जॉब फेअर इव्हेंटसाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3mTvudm वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आता रजिस्टर वर क्लिक करा. एक फॉर्म उघडेल तो पूर्ण भरा अॅमेझॉन करिअर डे २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक नाही. पण अॅमेझॉन एचआर प्रतिनिधींसह करिअर कोचिंग सत्रात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. या कार्यक्रमात Amazon चे जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष आणि देशातील प्रमुख अमित अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे करिअर काऊन्सिलिंग आणि कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाद्वारे अनेक पॅनल चर्चा असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yHytaS
via nmkadda

0 Response to "Amazon मध्ये ५५ हजारहून जास्त जागांवर भरती, माहितीसाठी 'या' लिंकवर क्लिक करा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel