Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-09-06T10:43:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Amazon तर्फे ८ हजार पदांची भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
Amazon : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर इंडियामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. अमेझॉन यावर्षी भारतात ८ हजार पदांची भरती करणार आहे. अमेझॉनतर्फे ८ हजार पदांसाठी उमेदवारांची थेट भरती होणार आहे. याअंतर्गत देशातील एकूण ३५ शहरांमध्ये कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि ऑपरेशन्स क्षेत्रात भरती होणार आहे. या ३५ शहरांमध्ये बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता, नोएडा, अमृतसर, अहमदाबाद, भोपाळ, कोईम्बतूर, जयपूर, कानपूर, लुधियाना, पुणे, सुरत, नोएडा इ. शहरांचा समावेश आहे. २०२५ पर्यंत २० लाख नोकऱ्या अमेझॉन कंपनी २०२५ पर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकूण २० लाख लोकांना नोकऱ्या देईल. यापैकी १० लाख नोकऱ्या भारतात असतील. कंपनीच्या एचआर प्रमुख दीप्ती वर्मा यांनी सांगितले, कंपनीने करोना महामारीच्या काळातही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ३ लाख जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. ५५ हजार जणांना नोकऱ्या अॅमेझॉन कॉर्पोरेट आणि टेक्नोलॉजी स्तरावर ५५ हजार जणांना नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. Amazonचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जेसी यांनी या भरतीबाबत माहिती दिली आहे. कंपनीला रिटेल, क्लाउड आणि जाहिरातींसह इतर व्यवसायांमधील गरजपूर्ण करण्यासाठी अधिक नोकरदारवर्गाची गरज आहे. आवश्यकता आहे. अमेरिकेत ४० हजार नोकऱ्या जेसीने जाहीर केले की, या ५५ हजार नोकऱ्यांपैकी ४० हजारांहून अधिक नोकऱ्या अमेरिकेत असतील. तर उर्वरित नोकऱ्या भारतासह जर्मनी आणि जपान सारख्या देशामध्ये उपलब्ध होतील. जॉब फेअर 'अॅमेझॉन करिअर डे'द्वारे ही भरती केली जाणार असल्याचे जेसीने म्हटले. . Amazonमधील नोकऱ्यांची अधिक माहिती अधिकृत वेबसाइट amazon.jobs/in वर मिळू शकले. 'अमेझॉन करिअर डे' सुरु अमेझॉन करिअर डे (Amazon Career Day)१६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल.हा एक विनामूल्य कार्यक्रम आहे. कंपनीने एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले की, हा संवादात्मक कार्यक्रम नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी खुला आहे. उमेदवारांचा त्यांच्या क्षेत्रातील अनुभव, व्यावसायिक क्षेत्राची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी आणि तुम्हाला इथे काम करायचे असले किंवा नसले तरीही तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. अशी करा नोंदणी जॉब फेअर इव्हेंटसाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3mTvudm वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आता रजिस्टर वर क्लिक करा. एक फॉर्म उघडेल तो पूर्ण भरा अमेझॉन करिअर डे २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक नाही. पण अॅमेझॉन एचआर प्रतिनिधींसह करिअर कोचिंग सत्रात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. या कार्यक्रमात Amazon चे जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष आणि देशातील प्रमुख अमित अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे करिअर काऊन्सिलिंग आणि कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाद्वारे अनेक पॅनल चर्चा असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WOBd9f
via nmkadda