Bank job 2021: साऊथ इंडियन बँकेत भरती, 'येथे' करा अर्ज Rojgar News

Bank job 2021: साऊथ इंडियन बँकेत भरती, 'येथे' करा अर्ज Rojgar News

South Indian Bank : तुम्ही जर बॅंकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लिमिटेडमध्ये (South Indian Bank Ltd) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती स्केल I पदासाठी असणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट Southindianbank.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. फॉर्ममध्ये काही विसंगती आढळली तर अर्ज बाद करण्यात येईल. एसआयबीमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ०१ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासााठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये असा सल्ला देण्यात आला आहे. शेवटच्या दिवशी वेबसाइटवर गर्दी होऊन याचा फटका उमेदवारांना बसू शकतो. उमेदवारांनी नोंदणीकृत ईमेल आयडीवरुन अर्ज करावा. अर्जदारांना नोंदणीसाठी इंटरनेट एक्सप्लोर ७ किंवा मोझिला फायरफॉक्स ब्राउझर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदवीमध्ये किमान ५० टक्के असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पात्रतेसंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना नोटिफिकेशन पाहावे लागणार आहे. महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: १ सप्टेंबर २०२१ ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ०८ सप्टेंबर २०२१ निवड प्रक्रिया साऊथ इंडियन बँकेने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, पीओ पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि अंतिम मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38wlVbU
via nmkadda

0 Response to "Bank job 2021: साऊथ इंडियन बँकेत भरती, 'येथे' करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel