Bank Job 2021: 'या' राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती Rojgar News

Bank Job 2021: 'या' राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती Rojgar News

Bank Job 2021: दमण आणि दीव (Daman and Diu ) यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. सहायक (माहिती आणि तंत्रज्ञान) विभागाअंतर्गत ५ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. तसेच अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत पाठविणे गरजेचे आहे. या भरतीअंतर्गत प्रोग्रामर, डेटाबेस स्पेशालिस्ट, आयटी सपोर्ट या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दमण आणि दीव राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात ही भरती आहे. यासाठी उमेदवाराचे वय २१ वर्षे ३० वर्षे असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी ही डिग्री असणे गरजेचे आहे. २ वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. त्यानंतर उमेदवाराची कार्यक्षमता पाहून हा कालावधी १ वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो. उमेदवाराने समाधानकारक काम न केल्यास, गैरप्रकार केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. या पदभरतीत निवड झालेल्या उमेदवारांना २.४६ लाख (वार्षिक) पगार दिला जाणार आहे. २ वर्षाच्या प्रोबेशन कालावधीत उमेदवाराने नोकरी सोडल्यास ३ महिन्याचा पगार कापला जाऊ शकतो. दादरा नगर हवेली, दमण, दीव यापैकी कोणत्याही ठिकाणी उमेदवाराला पोस्टिंग मिळू शकते. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://3dcoopbank.in वरुन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तसेच अर्जाची प्रत जनरल मॅनेजर (प्रशासन), दमन आणि दीव स्टेट को -ऑप बँक लि., मुख्यालय: एच. क्रमांक १४/५४, पहिला मजला, दिपील नगर, नानी दमण- ३९६२१९ या पत्त्यावर पाठवायची आहे. ३० सप्टेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nT0Els
via nmkadda

0 Response to "Bank Job 2021: 'या' राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel