BMC Recruitment 2021: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, दहावी ते पदवीधरांना संधी Rojgar News

BMC Recruitment 2021: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, दहावी ते पदवीधरांना संधी Rojgar News

BMC Recruitment 2021: मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेत विविध विभागातील भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदभरतीमध्ये हाऊसमन पदांच्या एकूण १५ जागा भरण्यात येणार आहेत. कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट आणि कार्यकारी सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मुंबई पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या १)भाभा रुग्णालय वांद्रे, २)व्ही.एन.देसाई रुग्णालय (सांताक्रुझ), ३)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली, ४)के.भी.भाभा रुग्णालय, कुर्ला, ५)शताब्दी रुग्णालय, गोवंडी ६)राजावाडी रुग्णालय, घाटकोपर या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम अंतर्गत कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार आहे. पदांचा तपशील कनिष्ठ ग्रंथपाल पदासाठी उमेदवाराकडे मुंबई विद्यापीठ किंवा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी असणे गरजेचे आहे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. कनिष्ठ आहारतज्ञ पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठात होमसायन्समधील पदवीधारक असावा किंवा डायटिस्ट, न्युट्रीशनमधील पदव्युत्तर पदवीधारक असावा. ऑप्टोमेट्रिस्ट या पदासाठी उमेदवाराकडे दहावी ते ऑप्टोमेट्रिस्टमध्ये ३ वर्षाची पदवी, बारावी परीक्षेसह बीएससी ऑप्ट्रोमेट्रीस्टमधील पदवीधारक असावा. ऑडिओलॉजिस्ट पदासाठी उमेदवार हा भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडियोलॉजी किंवा स्पीच थेरपीमधील पदवी किंवा पदवीधारक असावा. कार्यकारी सहाय्यक या पदासाठी उमेदवार हा कला, वाणिज्य आणि विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवार मराठी, इंग्रजी टायपिंग आणि एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा. पगार कार्यकारी सहाय्यक पदासाठी १५ हजार रुपये पगार तर इतर सर्व पदांसाठी २५ हजार दरमहा पगार दिला जाणार आहे. यासाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करायचा आहे. अर्जासाठी पत्ता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, रोख विभाग, खोली क्र.१५, कॉलेज बिल्डिंग, तळ मजला, लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या आणि अपूर्ण अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ziXnxT
via nmkadda

0 Response to "BMC Recruitment 2021: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, दहावी ते पदवीधरांना संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel