BPCL मध्ये पदवीधर आणि तंत्रज्ञांना कामाची संधी, भरतीचा तपशील जाणून घ्या Rojgar News

BPCL मध्ये पदवीधर आणि तंत्रज्ञांना कामाची संधी, भरतीचा तपशील जाणून घ्या Rojgar News

Apprentice 2021: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल(Bharat Petroleum Corporation Limited, BPC)ने अॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या अंतर्गत एकूण ८७ पदांची भरती केली जाणार आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांवर भरती केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजना, NATS ची अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना या पदभरतीसाठी २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. रिक्त पदाचा तपशील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या ४२ जागा आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीच्या ४५ पदांची भरती केली जाईल. बीपीसीएलच्या माहितीनुसार १९७३ च्या कायद्यानुसार प्रशिक्षणार्थीचा कालावधी एक वर्षाचा असेल. शैक्षणिक पात्रता पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिग्री असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून ६.३ सीजीपीए असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राज्य तंत्र शिक्षण मंडळ / मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयातील इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार सवलत देण्यात आली आहे. अशा प्रकारे होणार निवड बीपीसीएलने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार पात्रता परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी ही सामान्य एससी/ एसटी/ ओबीसी/ पीडब्ल्यूडी श्रेणीनुसार तयार केली जाणार आहे. भरतीशी संबंधित अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर मिळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39eRMhp
via nmkadda

0 Response to "BPCL मध्ये पदवीधर आणि तंत्रज्ञांना कामाची संधी, भरतीचा तपशील जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel