Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-09-15T06:43:43Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CA Course Fee: करोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी ICAI चा महत्वपूर्ण निर्णय Rojgar News

Advertisement
Fee:'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' म्हणजेच आयसीएआयने काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ने १५ सप्टेंबर २०२१ रोजी या महत्त्वाच्या घोषणेशी संबंधित नोटीस जाहीर केली आहे. ही योजना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३ दरम्यान नोंदणी केलेल्या उमेदवारांना लागू राहणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान (IT), ICITSS सह ओरिएंटेशन कोर्स (OC), AICITSS अॅडव्हान्स माहिती तंत्रज्ञान आणि मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन स्कील्स (MCS) अभ्यासक्रमांसह सर्व स्तरांवर चार्टर्ड अकाउंटंट (CA) अभ्यासक्रमांसाठी या योजनेअंतर्गत नोंदणी शुल्क माफ केले जाणार आहे. याप्रमाणे अर्ज करा नोंदणी शुल्क माफ करण्याच्या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या एसएसपी पोर्टलवरुन नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. यानंतर, विद्यार्थ्यांनी संबंधित कोर्ससाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यासोबतच नोटीसमध्ये दिल्या गेलेल्या संबंधित प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेले पालकांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. यानंतर तात्पुरत्या नोंदणी दरम्यान विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही. यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. विद्यार्थी योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असल्याचे आढळल्यास त्याचा फॉर्म रद्द केला जाईल. यापूर्वी ICAI ने जुलै २०२१ मध्ये आयोजित CA अंतिम (जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम) आणि चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमांच्या फाउंडेशन कोर्सचे निकाल जाहीर केले होते. १३ सप्टेंबर २०२१ रोजी सीए अंतिम आणि फाऊंडेशन निकाल संस्थेने जाहीर केला. या परीक्षांना बसलेले उमेदवार त्यांचे निकाल तपासू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Aem14a
via nmkadda