CA Result 2021: कोणकोणत्या वेबसाइट्सवर पाहता येणार सीए निकाल... जाणून घ्या Rojgar News

CA Result 2021: कोणकोणत्या वेबसाइट्सवर पाहता येणार सीए निकाल... जाणून घ्या Rojgar News

CA Final Result 2021: जुलै २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या फायनल (ओल्ड कोर्स आणि न्यू कोर्स) आणि फाउंडेशन कोर्सची चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे सीए फाइनल (ओल्ड आणि न्यू कोर्स) आणि फाउंडेशन कोर्सच्या निकालाची घोषणा सोमवारी १३ सप्टेंबर २०२१ रोजी होण्याची शक्यता आहे. संबंधी संस्थेने १० सप्टेंबर रोजी एक ट्विट केले होते. यानुसार सीए परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी आपला निकाल पाहता येणार आहे. सीएची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली. सीए अंतिम (जुनी स्कीम) गट १ ची परीक्षा ५, ७, ९ आणि ११ जुलै रोजी आणि सीए अंतिम (जुनी स्कीम) गट २ ची परीक्षा १३, १५, १७ आणि १९ जुलै रोजी घेण्यात आली होती. websites: पुढील वेबसाइट्स वर पाहा निकाल caresults.icai.org icai.nic.in वरील तिन्ही आयसीएआयची अधिकृत संकेतस्थळे आहेत. विद्यार्थी या तीन वेबसाइट्स वर आपला निकाल पाहू शकतात. जर निकाल सोमवारी १३ सप्टेंबर रोजी जाहीर झाला तर निकालाची लिंक उमेदवारांना सायंकाळपर्यंत या वेबसाइट्स वर मिळेल. ईमेलद्वारे देखील मिळणार निकाल या परीक्षांना बसलेले उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org, caresult.icai.org, icai.nic.in वर पाहू शकतात. अंतिम परीक्षेचा निकाल (जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम) आणि फाउंडेशन परीक्षेच्या उमेदवारांना ईमेलद्वारे त्यांचा निकाल मिळू शकेल. उमेदवारांना ११ सप्टेंबरपासून icaiexam.icai.org या वेबसाइटवर त्यांचे अर्ज करता येईल. जे विद्यार्थी यासाठी अर्ज नोंदणी करतील त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर रिझल्ट उपलब्ध होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C663tn
via nmkadda

0 Response to "CA Result 2021: कोणकोणत्या वेबसाइट्सवर पाहता येणार सीए निकाल... जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel