
CAT 2021: कॉमन एडमिशन टेस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी आज अखेरचा दिवस Rojgar News
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१
Comment

Registration 2021: कॅट परीक्षा के लिए रजिस्ट्रेशन प्रक्रिया आज २२ सप्टेंबर २०२१ रोजी संपणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही ते अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात. देशातील टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील प्रवेशांसाठी आयोजित होणाऱ्या या परीक्षेसाठी अर्जाची विंडो सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. जे उमेदवार यावर्षी होणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट साठी Common Admission Test, ) अर्ज करू इच्छितात, त्यांनी वेबसाइट iimcat.ac.in वर जावे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध नोटिफिकेशन पाहून घ्या. मागील वर्षी करोनामुळे बहुतांश आयआयएमने ऑनलाइन इंटरव्यू आयोजित केले होते. जीडी आणि पीआय आयोजित करण्याचे अधिकार संबंधित आयआयएमला असतो. कॅटची आयोजक संस्था यात दखल देऊ शकत नाही. कशी करायची नोंदणी? - रजिस्ट्रेशनसाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा. - नंतर वेबसाइटवर दिलेल्या Register च्या लिंक वर क्लिक करा. - यानंतर आपले नाव, वडिलांचे नाव, मोबाइल, ईमेल आणि अन्य माहिती भरून नोंदणी करा. - आता लॉग इन करून आपला अॅप्लिकेशन फॉर्म भरा. - फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. - यानंतर अॅप्लिकेशन फी जमा करा. - सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अॅप्लिकेशनचं प्रिंट घ्या. अॅडमिट कार्ड या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड (CAT Admit card 2021) विद्यार्थ्यांसाठी २७ ऑक्टोबर रोजी वेबसाइटवर उपलब्ध केले जातील. हॉलतिकिट जारी झाल्यानंतर आवश्यक डिटेल्स भरून कॅट हॉलतिकिट डाऊनलोड करता येईल. या परीक्षेचा निकाल वेबसाइट वर जारी सूचना बुलेटिननुसार जानेवारी, २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात घोषित केला जाईल. परीक्षा कशी असेल? किमान ५० टक्के गुण किंवा समकक्ष सीजीपीएसह पदवी प्राप्त केलेले उमेदवार साठी अर्ज करू शकतात. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांसाठी, किमान ४५ टक्क गुण आवश्यक आहेत. पदवी किंवा समकक्ष योग्यता परीक्षेच्या अंतिम वर्षासाठी उपस्थित होणारे उमेदवार आणि ज्यांनी परीक्षा देऊन पदवीच्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत ते उमेदवारही अर्ज करू शकतात. परीक्षा तीन सत्रात आयोजित केली जाईल. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZbDOew
via nmkadda
0 Response to "CAT 2021: कॉमन एडमिशन टेस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी आज अखेरचा दिवस Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा