Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-09-25T07:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CAT 2021: अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी करेक्शन विंडो खुली Rojgar News

Advertisement
CAT 2021: CAT २०२१ च्या अर्जातील दुरुस्तीसाठी विंडो खुली करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आयआयएम, अहमदाबाद कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ () च्या अर्जामध्ये दुरुस्तीसाठी अधिकृत वेबसाइटवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. याद्वारे उमेदवार आपल्या अर्जामध्ये इच्छित बदल करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट IIM iimcat.ac.in ला भेट द्यावी लागेल. अर्जात सुधारणा करताना उमेदवार फोटो, स्वाक्षरी आणि परीक्षा केंद्राची पसंती यामध्ये सुधारणा करु शकतील. या व्यतिरिक्त इतर कोणतेही बदल स्वीकारले जाणार नाहीत. करेक्शन विंडो २५ सप्टेंबरपासून खुली करण्यात आली असून २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ पर्यंत खुली राहील. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. कॅट २०२१ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २२ सप्टेंबर २०२१ रोजी बंद करण्यात आली. त्याचबरोबर CAT 2021 ची परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी घेतली जाईल. तर परीक्षेसाठी प्रवेशपत्र २७ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. CAT 2021: अर्जात असे करा बदल CAT अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांनी सर्वातआधी अधिकृत वेबसाइट IIMs iimcat.ac.in वर जा. यानंतर होमपेजवरील अॅप्लिकेशन करेक्शन विंडोवर क्लिक करा. स्क्रीनवर एक नवीन पेज खुले होईल. त्यानंतर क्रेडेंशियल टाकून आणि अर्जात बदल करा. पेजची प्रिंटआउट घ्या. संस्थेने CAT परीक्षा नोंदणीसाठी शेवटची तारीख वाढविण्यात आली होती. कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) साठी १५ सप्टेंबर रोजी संपलेली नोंदणी प्रक्रिया २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत करता येत होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i6H4hY
via nmkadda