CBSE कडून नोव्हेंबर / डिसेंबर परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे नोटिफिकेशन जाहीर Rojgar News

CBSE कडून नोव्हेंबर / डिसेंबर परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे नोटिफिकेशन जाहीर Rojgar News

Board Exams 2021-22: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार टर्म १ नोव्हेंबर / डिसेंबर बोर्डाची परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डातर्फे सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना उमेदवारांची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांची यादी (List of Candidate or LOC) जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व शाळा १७ सप्टेंबर २०२१ पासून ही यादी अधिकृत पोर्टलवर अपलोड करू शकतात. LOC सबमिट करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. महत्वाच्या तारखा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी LOC जमा करण्याची तारीख - ७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ LOC सबमिट करण्यासाठी फी भरण्याची शेवटची तारीख - १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह उमेदवारांची यादी अपलोड करणे CBSE बोर्डाने जाहीर केलेल्या अधिकृत नोटिफिकेशनुसार, शाळांना आधीच १६ ऑगस्ट २०२१ पासून उमेदवारांची यादी काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. याअंतर्गत आजपासून डेटा संकलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांनी अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in वर LOC यादी तयार आणि अपलोड करायची आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, शाळांनी डेटा योग्य आणि वेळेवर सादर करावा. उमेदवारांची यादी तयार करताना शैक्षणिक संस्थांनी मुलाची इतर कोणत्याही बोर्डाकडे नोंदणी नाही हे सुनिश्चित करायला हवे. विद्यार्थ्यांनी नियमितपणे वर्गांना हजेरी दिली पाहिजे यासाठी शाळांनी प्रयत्न करावे. या व्यतिरिक्त सीबीएसईशी संलग्न शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना जाहीर करण्यात येणारी नोटिफिकेशन वेळोवेळी तपासावी असे आवाहन बोर्डाने केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AedRZv
via nmkadda

0 Response to "CBSE कडून नोव्हेंबर / डिसेंबर परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे नोटिफिकेशन जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel