Advertisement
Exam: सीबीएसई बारावीचे खासगी, कॉरेस्पॉडंट आणि इतर कंपार्टमेंटचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तात्पुरत्या (प्रोव्हिजनल) प्रवेशास अर्ज करू शकतात पण त्यांना निकाल जाहीर झाल्याच्या एका आठवड्यात तो संबंधित संस्थांसमोर सादर करावा लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. पुरवणी परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते (प्रोव्हिजनल) प्रवेश देण्याचे निर्देश महाविद्यालये, विद्यापीठांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. सीबीएसई बारावीचे खासगी आणि इतर कंपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची घोषणा होण्यास विलंब होऊ शकतो आणि अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश नाकारला जाऊ शकतो अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले की, 'सीबीएसई बारावीच्या अशा सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. तर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आधीच घोषित करण्यात आला आहे.' यावर खंडपीठाने म्हटले, 'विद्यार्थी तात्पुरत्या आधारावर उच्च शिक्षण करण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांमध्ये अर्ज करू शकतात. मात्र सीबीएसईने निकाल जाहीर केल्याच्या तारखेपासून एका आठवड्याच्या आत परीक्षेचा निकाल संबंधित महाविद्यालय/संस्थेला सादर केला जावा.' शुक्रवारी न्यायालयाने खासगीरित्या तसेच पुरवणी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल, पदवी प्रवेश यावर चर्चा केली. याचिकाकर्त्यांनी एक अॅडव्हान्स्ड कॉपी एआयसीटीईला द्यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. कारण एआयसीटीई ही तंत्र शिक्षणाची देशातील शिखर संस्था आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांना खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्याशिवाय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवू नये असे निर्देश यूजीसीला देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांचे वकील अजनेय मिश्रा यांनी केली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lkENRh
via nmkadda