CTET डिसेंबरसाठी नोंदणी सुरु, 'या' थेट लिंकवरुन करा अर्ज Rojgar News

CTET डिसेंबरसाठी नोंदणी सुरु, 'या' थेट लिंकवरुन करा अर्ज Rojgar News

CTET 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने () केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर केली आहे. यासाठी उमेदवारांना २० सप्टेंबर २०२१ पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी (CTET नोंदणी २०२१) करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) आयोजित केली जाणारी सेंट्रल टिचर एलिजिबिलीटी टेस्ट म्हणजेच सीटीईटी यावर्षी १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान आयोजित केली जाणार आहे. सीटीईटी २०२१-२२ परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना १९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार देशभरातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि आर्मी शाळांमधील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात. २० भाषांमध्ये होणार परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे. ही परीक्षा देशभरातील २० भाषांमध्ये कॉम्प्युटर आधारित चाचणीच्या माध्यमातून घेतली जाईल. परीक्षेचा अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, फी इत्यादींची तपशीलवार माहिती सीटीईटी वेबसाइटवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे करा नोंदणी स्टेप्स १: नोंदणी करण्यासाठी सर्वातआधी CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा. स्टेप्स २: वेबसाइटवर दिलेल्या नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. स्टेप्स ३: आता नाव, ईमेल, मोबाईल नंबर आणि मागितलेली इतर माहिती सबमिट करा. स्टेप्स ४: आता लॉगिन करा. स्टेप्स ५: अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती सबमिट करा. स्टेप्स ६: फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. स्टेप्स ७: आता अर्ज शुल्क भरा स्टेप्स ८: सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेवटी प्रिंट काढआ अर्ज शुल्क केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET मध्ये एकाच विषयासाठी नोंदणी केलेल्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ७०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी,एसटी आणि पीएच प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क ३५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. दोन्ही विषयांसाठी नोंदणी शुल्क सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी १२०० रुपये आणि एससी, एसटी आणि पीएच श्रेणीसाठी ६०० रुपये निश्चित केले आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने फी भरता येते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nOoSNV
via nmkadda

0 Response to "CTET डिसेंबरसाठी नोंदणी सुरु, 'या' थेट लिंकवरुन करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel