Advertisement
DFCCIL Exam Date 2021: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्ये ज्युनिअर मॅनेजर (),ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (junior Exicutive) आणि एक्झिक्युटिव्ह (Exicutive)अंतर्गत अनेक पदांच्या भरती होणार आहे. संस्थेतर्फे या भरतीसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट dfccil.com परीक्षेचा संपूर्ण तपशील पाहता येणार आहे. रेल्वे अंतर्गत येणारी कंपनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) अंतर्गत १०७४ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया २४ एप्रिल २०२१ रोजी सुरू झाली. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३० जुलै २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला होता. अर्जदारांना फी जमा करण्याची ही शेवटची तारीख देखील देण्यात आली होती. या रिक्त पदांसाठी २७ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहेत. या पदांवर भरती ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन्स आणि बीडी) - २२५ पदे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (सिग्नल आणि टेलीकम्युनिकेशन) - १४५ पदे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) - १३५ पदे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) - १४ पदे ज्युनिअर मॅनेजर (सिव्हिल)- ३१ पदे ज्युनिअर मॅनेजर (ऑपरेशन्स आणि बीडी) - ७७ पदे ज्युनिअर मॅनेजर (मेकॅनिकल) - ३ पदे एक्झिक्युटिव्ह(ऑपरेशन्स आणि बीडी) - २३७ पदे एक्झिक्युटिव्ह (नागरी) - ७३ पदे एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) - ४२ पदे एक्झिक्युटिव्ह (सिग्नल आणि दूरसंचार) - ८७ पदे एक्झिक्युटिव्ह (मेकॅनिकल) - ३ पदे निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन सीबीटी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. कॉम्प्युटर आधारित चाचणी (सीबीटी) मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागांचा तपशील एक्झिक्युटिव्ह पदांसाठी सर्वाधिक २३७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये खुल्या वर्गासाठी ९६ जागा आहेत, याशिवाय ईडब्ल्यूएस वर्गासाठी २३ जागा, ओबीसी वर्गासाठी ६५ जागा, एससीसाठी ३६ जागा आणि १७ जागा एसटीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदाच्या २२५ जागांवर भरती केली जाणार आहे. या पदांमध्ये खुल्या गटासाठी ९० जागा, ईडब्ल्यूएससाठी २३ जागा, ओबीसीसाठी ६१ जागा, एससीसाठी ३४ आणि एसटीसाठी १७ जागा देण्यात आल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WWXHFD
via nmkadda