Engineers Day 2021: कधी येणार इंजीनिअर्सचे 'अच्छे दिन'? Rojgar News

Engineers Day 2021: कधी येणार इंजीनिअर्सचे 'अच्छे दिन'? Rojgar News

म.टा. प्रतिनिधी, नागपूर Engineers Day Special: गेल्या काही वर्षांगणिक इंजीनिअरिंगचे शिक्षण आणि इंजिनीअर्सच्या नोकऱ्या हा विषय विशेष चर्चत राहिला आहे. एकीकडे इंजिनीअरिंग कॉलेजांना विद्यार्थी मिळत नसताना इंजिनीअर्स झालेल्यांना नोकऱ्याच मिळत नसल्याचे चित्र दरवर्षी दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी इंजिनीअरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ दिसून यायची. मात्र, आता काही नामांकित कॉलेजेस वगळल्यास इतर कॉलेजांना विद्यार्थी मि‌‌ळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये राज्यात अभियांत्रिकीच्या तब्बल ४९ टक्के जागा रिक्त होत्या. दरवर्षी कमी अधिक फरकाने हेच चित्र कायम असल्याचे दिसून येते आहे. इंजिनीअरिंग पदवी मि‌ळवूनही कौशल्ये आणि ज्ञान यामध्ये हे विद्यार्थी कमी पडत असल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदविले आहे. 'विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. वाढत्या जागतिकीकरणामुळे स्पर्धेत कमालीची वाढ होत आहे. त्या तुलनेत शिक्षणाचा दर्जा मात्र दिवसेंदिवस खालावत आहे. वर्गखोली आणि पुस्तकांच्या बाहेर पडून प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देणे गरजेचे आहे', असे मत आयआयटी बॉम्बेमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेले ऋग्वेद निनावेकर यांनी मांडले. 'करोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र नव्या नोकऱ्यांमध्ये वाढही झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची कमतरता आहे. त्यामुळे, कॅम्पस मुलाखतींमध्ये स्थानिक विद्यार्थी मागे पडलेला दिसून येतो. विद्यार्थ्यांनी सॉफ्टस्किल्सकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करावयाचे असेल तर विद्यार्थी टेक्नोसॅव्ही आहे की नाही, हेही बघितले जाते. म्हणून तंत्रज्ञानाचे पायाभूत ज्ञान असणे आवश्यक आहे', असे मत प्रा. विवेक नानोटी यांनी मांडले. का साजरा केला जातो अभियंता दिन? सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १५ सप्टेंबर हा त्यांचा जयंती दिवस 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. पिण्याच्या पाण्याच्या योजना, नदीवरचे बंधारे, पूल यांच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. १९१७ साली त्यांनी बेंगळुरूमध्ये शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना केली. १९५५ साली त्यांना विशेष योगदानासाठी भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lqwvan
via nmkadda

0 Response to "Engineers Day 2021: कधी येणार इंजीनिअर्सचे 'अच्छे दिन'? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel