Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-04T11:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

FYJC Admission 2021: अकरावी प्रवेशांची दुसरी यादी जाहीर Rojgar News

Advertisement
Maharashtra : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी जाहीर झाली. विद्यार्थी अकरावी प्रवेशांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही यादी पाहून शकता. शिवाय त्यांना त्यांच्या प्रवेशाबाबतच्या माहितीचा अलर्टही एसएमएसद्वारे मिळणार आहे. मुंबई विभागात एकूण ६०,०३७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत प्रवेश अलॉट झाले आहेत. यंदा सुमारे ३.७५ लाखांवर विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशांसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३.६ लाख विद्यार्थी प्रवेशांसाठी पात्र होते. मुंबई विभागाची शाखानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - शाखा -- एकूण जागा (कोटा वगळून) -- एकूण अर्ज -- अलॉट झालेले प्रवेश कला -- १७,६०५ -- ९,८९१ -- ५,१२५ वाणिज्य - ७७,२५९ -- ८०,७५८ -- ३७,१८६ विज्ञान -- ४२,१८८ -- ४२,४६७ -- १७,३३३ एमसीव्हीसी -- २,७४२ -- ६०७ -- ३९३ एकूण विद्यार्थी -- १,३९,७९४ -- १,३३,७२३ -- ६०,०३७ मुंबई विभागात कला शाखेच्या एकूण १,७५८, वाणिज्यच्या ७,३५२, विज्ञान शाखेच्या ३,२८४ आणि एमसीव्हीसीच्या ३४८ अशा एकूण १३,२८२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले आहे. एकूण ११,०७५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या तर ८,३९८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कॉलेज अलॉट झाले आहे. मुंबई विभागात एसएससी बोर्डाच्या ५५,६६४, सीबीएसईच्या १,५७३ आणि आयसीएसईच्या २,१३१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कॉलेज अलॉट झाले आहे. एफवायजेसीची पहिल्या फेरीची कट ऑफ टक्केवारी सर्वच शाखांमध्ये २ ते ३ टक्क्यांनी घसरली होती. मुंबई विभागात पहिल्या यादीनुसार सर्वाधिक १,१७,८८३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाले होते. त्यापैकी ८० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BJTUdd
via nmkadda