Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २८, २०२१ WIB
Last Updated 2021-09-28T04:43:38Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

FYJC Admission 2021: अकरावीसाठी आजपासून प्राधान्य फेरी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, मुंबई अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी () मुख्य प्रवेशाच्या तीन प्रवेश फेऱ्या आणि त्यानंतरच्या विशेष फेरीनंतरही एक लाखहून अधिक जागा रिक्त राहिल्याने आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य धर्तीवर सात टप्प्यांमध्ये प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले असून पहिली फेरी आज, मंगळवारपासून सुरू होणार आहे. प्राधान्य फेरीमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगर क्षेत्रांतील ज्युनिअर कॉलेजांतील प्रवेश ऑनलाइन नोंदणीने केले जाणार आहेत. ज्या कॉलेजांमध्ये रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करून हे प्रवेश घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ९० टक्यांवरील विद्यार्थ्यांना २८ व २९ सप्टेंबरला नोंदणी करता येणार आहे. सकाळी १०पासून सायंकाळी ६ या वेळेत नोंदणी करून संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. यानंतर ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबरला ८० टक्क्यांवरील, २ ते ४ ऑक्टोबर ७० टक्क्यांवरील, ५ ते ६ ऑक्टोबर ६० टक्क्यांवरील, ७ ते ९ ऑक्टोबर ५० टक्क्यांवरील, १० ते १२ ऑक्टोबर ३५ टक्क्यांवरील आणि शेवटची फेरी एटीकेटी आदी विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांची माहिती शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. राज्यभरातील रिक्त जागा अमरावती ७,०३३ मुंबई १,३६,०३९ नागपूर २९,९४१ नाशिक ८,८३५ पुणे ५२,२८७ एकूण २,३४,१३५


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AJ3KMu
via nmkadda