TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

FYJC Merit List: दुसऱ्या यादीनुसार ६० हजारपैकी अवघ्या २१ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेशासाठी कॉलेज मिळालेल्या ६० हजार ३७ विद्यार्थ्यांपैकी अवघ्या २१ हजार ११६ विद्यार्थ्यांनीच त्यांचा प्रवेश निश्चित केला आहे. यामुळे आता तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी एक लााख १९ हजार ३३३ जागा उपलब्ध राहणार असून, तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी ९ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता जाहीर झाली. यामध्ये ६० हजार ३७ विद्यार्थ्यांना जागा मिळाली होती. या विद्यार्थ्यांपैकी वाणिज्य शाखेतील १२ हजार २४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर विज्ञान ६४६७, कला २०८७ आणि एचएसव्हीसी शाखेच्या ३१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे अवघ्या २१ हजार ११६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले. पहिल्या व दुसऱ्या यादीतील मिळून ७९,४१६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. तर राखीव कोट्यातून २८ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे तिसऱ्या यादीसाठी एक लाख १९ हजार ३३३ जागा उपलब्ध झाल्या आहेत. तिसऱ्या यादीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, अर्जात बदल करणे, ऑप्शन बदलणे यासाठी ९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. १३ सप्टेंबरला तिसरी यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर १३ ते १५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vr67Ef
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या