Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-14T14:43:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

FYJC Online Admission: ७० हजार विद्यार्थ्यांना अद्याप अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ( Third Merit List) सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ९६४ विद्यार्थ्यांनाच कॉलेजांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या यादीनंतर सुमारे ७० हजार ४९७ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे लक्ष लागले आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या दोन गुणवत्ता याद्या नव्वदीपार झाल्याने तिसर्‍या यादीबाबत विद्यार्थ्यांना आशा होती. मात्र नामांकित कॉलेजांमधील तिसरी गुणवत्ता यादीही नव्वदीपारच राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून पुढील यादीची वाट न पाहता मिळेल त्या कॉलेजांत प्रवेश घेण्याची तयारी करण्यात आली आहे. पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये नामांकित कॉलेजांमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने तिसर्‍या फेरीमध्ये प्रवेश मिळण्याची आशा त्यांना होती. मात्र नामांकित कॉलेजांतील तिसर्‍या फेरीची गुणवत्ता यादीही नव्वदीपारच राहिल्याने या कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून, त्यांच्याकडून मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. तिसर्‍या यादीसाठी उपलब्ध असलेल्या १ लाख १९ हजार ३३३ जागांसाठी १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये वाटप झालेल्या ३९ हजार ९६४ जागांपैकी २५ हजार ५३९ जागा वाणिज्य शाखेसाठी, ११ हजार ५७ जागा विज्ञान शाखेसाठी तर कला शाखा ३१५२ आणि एचएसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी २१५ जागांचे वाटप झाले आहे. यामध्ये एसएससी बोर्डातील १ लाख ४० हजार ७७ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेश वाटप करण्यात आले आहे. तर सीबीएसईच्या २९३५ विद्यार्थ्यांच्या अर्जांपैकी १०२२ विद्यार्थी, आयसीएसईच्या २२४७ विद्यार्थ्यांच्या अर्जापैकी ११३७ विद्यार्थ्यांना जागावाटप झाले आहे. तर अन्य मंडळाच्या १२०२ विद्यार्थ्यांपैकी ४७८ विद्यार्थ्यांना जागावाटप झाले आहे. ६,९१६ विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज तिसर्‍या यादीमध्ये ६,९१६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले आहे. यानंतर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले सुमारे ७० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आता विशेष फेरीकडे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nxcKAs
via nmkadda