Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T05:43:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

GATE परीक्षेसाठी अद्याप नोंदणी न केलेल्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
GATE 2022: ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) २०२२ परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. परीक्षेसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अद्यापही केली नसेल तर आज त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. याची नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच ३० ऑगस्टपासून सुरू झाली आहे. २४ सप्टेंबर ही नोंदणीची शेवटची तारीख आहे. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट आयआयटी खडगपूर- iitkgp.ac.in, gate.iitd.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन (GATE Registration 2022)साठी अर्ज करू शकतात. या वेळी गेट २०२२ ची परीक्षा आयआयटी खडगपूर च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. उमेदवारांना २४ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. उमेदवार एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात पण एकच अर्ज भरला जाईल. अर्ज भरताना काही त्रुटी असल्यास संस्थेकडून अर्ज दुरुस्ती विंडो २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत उघडली जाईल. १२ नोव्हेंबरपर्यंत पेपर, कॅटेगरी किंवा परीक्षा केंद्र या पर्यायामध्ये दुरुस्ती करता येईल. Date: गेट २०२२ परीक्षा केव्हा? गेट २०२२ परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला केले जाणार आहे. आयआयटी खडगपूरने दिलेल्या माहितीनुसार, करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. GATE Exam schedule: पाहा संपूर्ण वेळापत्रक गेट २०२२ साठी ऑनलाइन नोंदणी सुरुवात- ३० ऑगस्ट २०२१ रेग्यूलर ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख- २४ सप्टेंबर २०२१ लेट फीससहित नोंदणीची शेवटची तारीख- १ ऑक्टोबर २०२१ परीक्षेची तारीख-५,६,१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ गेट रिझल्टची तारीख- १७ मार्च २०२२ अशी करा नोंदणी नोंदणी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी gate.iitb.ac.in या वेबसाइटवर जावे. यानंतर, होमपेजवर ऑनलाईन अर्ज लिंकवर क्लिक करा. नंतर दिलेल्या सूचना वाचून नवीन युजर/ रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. यानंतर मागितलेला तपशील भरून नोंदणीची प्रक्रीया पूर्ण करा. यानंतर स्वत:च्या ईमेल आयडी आणि पासवर्डने लॉग इन करून आणि परीक्षेशी संबंधित तपशील भरून नोंदणी पूर्ण करा. GATE २०२२ फॉर्म भरताना, उमेदवारांना IIT खरगपूर द्वारे १५०० रुपये शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरावे लागते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o21sEI
via nmkadda